कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मढी परिसरात श्री कानिफनाथ देवस्थानकडून औषध फवारणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 3, 2020

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मढी परिसरात श्री कानिफनाथ देवस्थानकडून औषध फवारणी

  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मढी परिसरात श्री कानिफनाथ देवस्थानकडून                                                   औषध फवारणी

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः जागतिक महामारी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथील श्री कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या कार्यरत विश्वस्त मंडळामधील अध्यक्ष शिवशंकर राजळे, उपाध्यक्ष सुनिलराव सानप, विश्वस्त आप्पासाहेब मरकड व मिलिंद चवंडके यांनी  देवस्थानकडे येणारे पंचक्रोशीतील रस्ते आणि मढी गावामध्ये सर्वत्र औषध फवारणीचे महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या विश्वस्त मंडळाने सामाजिक बांधिलकीच्या सद् भावनेतून गुढीपाडव्याच्या सुदिनी गावक-यांच्या हितासाठी घेतलेल्या या निर्णयाची तातडीने अंमलबजावणीही सुरू झाल्याने पंचक्रोशीमधून कौतुक होत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव गावात व परिसरात होऊ नये म्हणून श्री क्षेत्र मढी येथील प.पू.कानिफनाथांचे संजीवन समाधी मंदिर दैनंदिन पुजाविधी व्यतिरिक्त दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेले आहे. गुढीपाडव्याच्या पहाटे होणारा सामुदायिक महापूजा सोहळा शासकीय आदेशान्वये रद्द करण्याचाही निर्णय याच कार्यरत विश्वस्तांनी घेतला होता. मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतानाच देवस्थानकडे येणारे सर्व मार्ग आणि परिसरात औषध फवारणी करण्याचे ठरवले होते. गुढीपाडव्यापासून सुरू होत असलेल्या नववर्षात हा संकल्प सिध्दीस नेण्याचे व्यापक नियोजन देवस्थानच्या कार्यरत विश्वस्तांनी कर्मचारी वृंदांच्या सहकार्याने सुरूही केले.
शिवाय मढी गावामधील प्रत्येक घरात सॅनिटायझरची एक बाटली व मास्क पोहोचवण्याची आखणी करण्यात आली आहे. देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोकराव पवार, व्यवस्थापक बाबासाहेब मरकड व स्थानिक विश्वस्त आप्पासाहेब मरकड यांनी देवस्थानमधील कर्मचारी वृंदांच्या सहकार्याने मढी गावामध्ये औषध फवारणीच्या कार्यसिध्दीचा शुभारंभ केला आहे.
आपल्या देशाचे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांनी या जागतिक महामारी कोरोनाची साखळी तोडण्याच्या सद् भावनेने  देशभर लॉकडाऊन करत असल्याचे जाहिर केले. मा. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली लॉकडाऊनची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू झाली. यासाठी जिल्हा प्रशासन व पोलिस खाते अविश्रांत परिश्रम घेऊ लागले. लॉकडाऊनसाठी ड्युटी बजावत असलेले शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच पोलिस बांधव यांना आणि गोरगरीब गरजूंना श्रीकानिफनाथ देवस्थानकडून नाथप्रसाद पुरवण्याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.

देवस्थानचे अध्यक्ष शिवशंकर राजळे, उपाध्यक्ष सुनिलराव सानप, विश्वस्त आप्पासाहेब मरकड व मिलिंद चवंडके यांनी दिलेल्या सुचनांनुसार देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोकराव पवार, व्यवस्थापक बाबासाहेब मरकड, कर्मचारी संजय मरकड, संतोष मरकड, अविनाश मरकड, सुरेश मरकड, विजय रासकर, अशोक मरकड, राधाकृष्ण मरकड, बबन मरकड, पाराजी मरकड, अर्जुन मरकड आणि शिवाजी मरकड हे या सामाजिक कार्यासाठी सर्व दक्षता घेऊन वेळ देत आहेत.

No comments:

Post a Comment