शहरावर ड्रोनवरुन नजर! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 1, 2020

शहरावर ड्रोनवरुन नजर!

                                      शहरावर ड्रोनवरुन नजर!
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः कोरोनामुळे शहरात संचारबंदी लागू केली आहे. नागरिकांकडून ह्या आदेशाचे वारंवार उल्लंघन होताना दिसत आहे. करणाचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने आता शहरावर ड्रोनद्वारे नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्याची सुरूवात मंगळवार पासून झाली आहे. सध्या एक ड्रोन कॅमेर्‍याचा वापर करण्यात येत असल्याची माहिती उपअधीक्षक संदीप मिटके यांनी दिली.जिल्ह्यात कोरोना विषाणूचे आठ रुग्ण आढळले आहे. जिल्ह्यात कोणाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यामुळे प्रशासन सजग झाले आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये अशा सुचना प्रशासन वेळोवेळी देत आहे. तरी काही लोक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. नागरिक भाजी खरेदीसाठी मोठी गर्दी करत आहेत. पोलिसांनी विनाकारण फिरणार्‍या,संचारबंदीचे नियम मोडणार्‍यावर कलम 188 अन्वये गुन्हे दाखल केले आहे. परंतु, काही लोक पोलिसांची नजर चुकवून घराबाहेर पडत आहे. अशा लोकांवर आता ड्रोन नजर ठेवणार आहे. शहरातील गर्दीच्या ठिकाणी या ड्रोनची नजर असणार आहे. सावेडी, मुकुंदनगर, भिंगार परिसर, माळीवाडा, केडगाव आदी भागात ड्रोनची नजर असणार आहे. सध्या एक ड्रोन शहर पोलिसांना उपलब्ध झाला आहे. परंतु, गरजेनुसार यात वाढ केली जाणार आहे. ड्रोनच्या नजरेत आलेल्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे, असे शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी सांगितले.


No comments:

Post a Comment