मनपाच्यावतीने दीन-दुबळ्यांना मदतीचा हात - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 1, 2020

मनपाच्यावतीने दीन-दुबळ्यांना मदतीचा हात

                         मनपाच्यावतीने दीन-दुबळ्यांना मदतीचा हात
अहमदनगर ः देशावर व महाराष्ट्रावर कोरोना या संसर्ग विषाणूचे जे संकट आले आहे, त्यास तोंड देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 21 दिवसांचे लॉकडाऊनची घोषणा केली आहे. शहरामध्ये हातावर पोट भरणार्‍यांची संख्या खूप मोठी आहे. या संकट काळामध्ये सर्व उद्योगधंदे बंद असल्यामुळे अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. तरी गोरगरीब कुटुंबांना अन्नधान्य पुरविण्याचे काम आम्ही करत आहोत. तसेच शहरातील दीन-दुबळ्यांना जेवणाची व्यवस्था केली आहे. भाजपपक्षाच्यावतीने देशभर सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम सुरु आहे. कोरोना विषाणूच्या संकटाला हद्दपार करण्यासाठी सर्वांनी घरातच राहून सहकार्य करावे, असे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यावतीने ठिकठिकाणी गरजवंतांना मोफत किराणा माल घरपोच देण्याची व्यवस्था व दीन-दुबळ्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी बाळासाहेब वाकळे, पुष्कर कुलकर्णी, केशव वाकळे, किशोर वाकळे, बिभीषण आडोळे, संदीप आडोळे आदी यावेळी उपस्थित होते. महापौर पुढे म्हणाले की, अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने कोरोना संसर्ग विषाणूवर मात करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. मनपाच्यावतीने पूर्ण क्षमतेने उपाययोजना सुरु आहेत. शहरामध्ये सर्व भागामध्ये कीटकनाशक फवारणी होत आहे. तसेच स्वच्छतेची संपूर्ण काळजी घेण्याचे कामही सुरु आहे. तरी नागरिकांनी आपआपल्या घरात राहून शासनास सहकार्य करावे असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment