कोरोना पाठोपाठ ‘सारी’ फैलावतोय... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 17, 2020

कोरोना पाठोपाठ ‘सारी’ फैलावतोय...

कोरोना पाठोपाठ ‘सारी’ फैलावतोय...
नगर, जालना, नाशिकात हायअलर्ट


 
नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः राज्यात एकिकडे कोरोना विषाणूचा संसर्ग थैमान घालत आहे. आता दुसरीकडे सारीच्या फैलावाने डोकं वर काढल्याचं पाहायला मिळत आहे. अहमदनगरसह नाशिक जालना आणि राज्यातील इतर भागात सिविअर अ‍ॅक्युट रेस्पिरेटरी इलनेसचा (सारी) फैलाव होताना दिसत आहे. 
अहमदनगरमध्ये सारीचे देखील 42 रुग्ण आढळले आहेत. अहमदनगरमध्ये सारीने आत्तापर्यंत एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावच्या एका महिलेचा नुकताच सारीने मृत्यू झाला आहे. यानंतर अहमदनगर जिल्ह्यात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. यात संगमनेर, कोपरगाव, नेवासा, अहमदनगर शहर हॉटस्पॉट ठरत आहेत.अहमदगर जिल्ह्यात आज 21 व्यक्तींचे स्त्राव चाचणी केल्यानंतर निगेटिव्ह आले आहेत. तर 33 नमुन्यांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.अहमदनगरमध्ये कोरोना पाठोपाठ सारीचे रुग्णही आढळत आहेत. 11 एप्रिलपासून आजपर्यंत 42 रुग्ण सापडले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालय आणि महात्मा फुले जीवनदायी योजने अंतर्गत मान्यता दिलेल्या विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यात 23 पुरुष, 15 स्त्रिया आणि 4 बालकांचा समावेश आहे. अहमदनगरमध्ये कोरोनाचे 28 रुग्ण आहेत, तर सारीचे 42 रुग्ण आढळले आहेत.जालन्यात सारीचे दोन रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक मधुकर राठोड यांनी दिली आहे. तसेच इतर दोघांचे स्वॅब नमुने 10 एप्रिलला चाचणीसाठी औरंगाबादला पाठवण्यात आले. दुःखीनगर येथील 65 वर्षीय पहिली पॉझिटिव्ह महिलेची प्रकृती स्थिर आहे.नाशिकनाशिकमध्ये देखील कोरोना रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत आहे. त्यातच आता काही रुग्णांना सारी आजाराचेही लक्षणं दिसत आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयावर याचा ताण अधिक पडत आहे.

No comments:

Post a Comment