पत्रकाराच्या घरावर हल्ला; गुन्हा दाखल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 17, 2020

पत्रकाराच्या घरावर हल्ला; गुन्हा दाखल

पत्रकाराच्या घरावर हल्ला; गुन्हा दाखल
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील पानेगाव येथील सतरा कुटुंबाना होमक्वारंटाइन केलं असल्याची बातमी दिल्याने 100 ते 120 महिला आणि पुरुषांनी बाळासाहेब नवगीरे यांच्या घरावर अचानकपणे हल्ला चढवत घरातील सामानाची तोडफोड केली आहे. दरम्यान या घटने संदर्भात सोनई पोलिस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

नेवासा तालुक्यात राहणारे पत्रकार बाळासाहेब नवगीरे यांनी तालुक्यातील सतरा कुटुंबातील व्यक्तींना एकाच वेळी होमक्वारंटाइन करण्यात आली असल्याची बातमी एका नामांकीत वृत्तपत्रात  प्रसिद्ध केली होती,मात्र ही होमक्वॉरंटाइनची बातमीत वृत्तपत्रात छापलीस कशी अशी विचारणा करत तब्बल 100 ते 120 महिला पुरुषांनी पत्रकार बाळासाहेब नवगीरे यांच्या राहत्या घरावर हल्ला चढवत घरात घुसून सामानाची तोडफोड केली. सोनई पोलिस ठाण्यात कलम 188, 223, 143, 147, 149, 452, 427, 269, 270 नुसार संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. विषेश म्हणजे कोरोना संसर्ग आजार देशभरात पसरल्यानंतर अनेक रुग्णांना दवाखान्यात पोहचविण्यासाठी किंवा त्याच्याच जीवाच संरक्षण करण्यासाठी पुढे आलेल्या डॉक्टर , नर्सेस आणि पोलिस कर्मचारी यांना मारहाण झाल्याच्या अनेक घटना ताज्या असतानाच आज चक्क पत्रकाराच्या घरावरच हल्ला झाल्याने या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात असून अशा घटना थांबविण्यासाठी संबधित आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी अहमदनगर जिल्ह्यातील पत्रकार संघटनेमधून होत आहे.

No comments:

Post a Comment