कानिफनाथ देवस्थानकडून परिसरातील गरीबांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 15, 2020

कानिफनाथ देवस्थानकडून परिसरातील गरीबांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप

                          कानिफनाथ देवस्थानकडून परिसरातील गरीबांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप

मढी ः  कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी श्रीक्षेत्र मढी येथील श्रीकानिफनाथ देवस्थान ट्रस्टने परिसरातील गोर-गरीब कुटूंबियांना देवस्थानचे अध्यक्ष शिवशंकर राजळे व  विश्वस्त आप्पासाहेब राजळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मास्क व सॅनिटायझरचे वितरण केले. यावेळी देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोकराव पवार, माजी अध्यक्ष सचिन मरकड, डॉ.रमाकांत मरकड, माजी सरपंच भगवान मरकड, उपसरपंच रविंद्र आरोळे, ज्येष्ठ नागरिक विष्णु मरकड, बाबासाहेब कुटे, मनोहर साळवे हे ग्रामस्थही उपस्थित होते.
श्री कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या कार्यरत विश्वस्त मंडळामधील अध्यक्ष शिवशंकर राजळे, उपाध्यक्ष सुनिलराव सानप, विश्वस्त आप्पासाहेब मरकड व मिलिंद चवंडके यांनी देवस्थानच्यावतीने परिसरातील गोर-गरीब कुटूंबियांना मास्क व सॅनिटायझरचे मोफत वितरण करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. त्यासाठी दर्जेदार कापडी मास्क व सॅनिटायझरची खरेदी केली.

कोरोना महामारीबाबत जनजागृती करण्याचे कार्य देवस्थानने वाहन सेवेच्या माध्यमातून सुरू केलेलेच आहे. सध्याच्या लॉकडाऊनच्या कालावधीत दुर्गम भागातील व हातावर पोट असलेल्या गोर-गरीब गरजूंना श्रीकानिफनाथ देवस्थानमधील कर्मचा-यांमार्फत माध्यान्ह भोजनासाठी नाथप्रसाद पुरवण्यात येत आहे.  देवस्थानच्या अन्नछत्रमध्ये सर्व काळजी घेऊन तयार करण्यात आलेले दर्जेदार अन्नपदार्थ फुडपाकिटमध्ये उत्तम पॅकिंग करून भुकेल्या गरजूंना ते जेथे आहेत तिथे पोहोच करण्याची सेवा मानवतेच्या सद् भावनेने सुरू आहे.  रूग्णालयातील रूग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना, रस्त्याच्या कडेला आसरा घेत असलेल्या निराधारांना, दरमजल करत निघालेल्या प्रवाशांना, परतीच्या मार्गावर असलेल्या ऊसतोडणी कामगारांना, गरीब शेतमजूरांना माध्यान्ह भोजनाकरिता नाथप्रसाद  पुरवण्यासाठी विशेष दक्षता घेण्यात येत आहे. त्यामुळे पंचक्रोशीसह नगर जिल्ह्यामधील नाथभक्तांमधून देवस्थानच्या या राष्ट्रीय कार्याचे व सामाजिक सेवेचे कौतुक होऊ लागले आहे. देवस्थानचे अध्यक्ष शिवशंकर राजळे, उपाध्यक्ष सुनिलराव सानप, विश्वस्त आप्पासाहेब मरकड व मिलिंद चवंडके यांनी दिलेल्या सुचनांनुसार देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोकराव पवार, व्यवस्थापक बाबासाहेब मरकड, कर्मचारी संजय मरकड, संतोष मरकड, अविनाश मरकड, सुरेश मरकड, विजय रासकर, अशोक मरकड, राधाकृष्ण मरकड, बबन मरकड, पाराजी मरकड, अर्जुन मरकड आणि शिवाजी मरकड हे या सामाजिक कार्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत.

No comments:

Post a Comment