- Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, November 23, 2019

माजी खासदार दादा पाटील शेळके यांचे निधन
अहमदनगर : माजी खासदार मारुती देवराम उर्फ दादा पाटील शेळके (वय 80) यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. गेली काही महिने ते आजारी होते. नगर नेवासा मतदारसंघातून चार वेळा आमदार तर नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून दोनदा खासदार म्हणून ते निवडून आले होते. त्यांच्यामागे पत्नी, 1 मुलगा, 3 मुली असा परिवार आहे.
दादा पाटील यांचा जन्म 2 ऑगस्ट 1941 रोजी झाला. त्यांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतले. वयाच्या 21 व्या वर्षीच त्यांनी समाजसेवेच्या आवडीतून राजकारणात प्रवेश केला. चार वेळा आमदार व दोनदा खासदार होऊनही त्यांची राहणी अत्यंत साधी होती. त्यांच्या वागणुकीत कधीच डामडौल नव्हता. त्यामुळे त्यांचा पेहराव जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातही चर्चेचा व कौतुकाचा विषय होता.
दादा पाटील शेळके यांनी वाळकी येथे नगर तालुका सहकारी साखर कारखाना उभारणीत मोठे योगदान दिले. कारखान्याचे ते संस्थापक अध्यक्ष होते. नगर पंचायत समिती सभापती जि.प. सदस्य अशी पदापासून सुरूवात करत त्यांनी खासदारकीपर्यत मजल मारली. राजकारणात असूनही साधी राहणी हे त्यांचे वैशिष्ट्य होते. अनेक संस्था उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता. दादा पाटील शेळके 1978 ते 1994 या दरम्यान चार वेळा आमदार होते. तसेच दोन वेळा खासदार झाले. तत्पूर्वी 1962 ते 1978 दरम्यान जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले होते.  नगर तालुका पंचायत समितीचे उपसभापती, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष, महाराष्ट्र रोजगार हमी योजना समितीचे सदस्य, नगर तालुका देखरेख संघाचे अध्यक्ष, नगर तालुका दूध संघाचे अध्यक्ष, रयत शिक्षण संस्थेचे सदस्य, नगर तालुका सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष असे विविध पदे भुषविली. त्यांनी दुष्काळी पट्ट्यात म्हणजे नगर तालुक्यात सहकारी साखर कारखाना स्थापन केला. त्यांनी नगर तालुक्यात साधारण 30 महाविद्यालये स्थापन करून स्थानिक संस्थांकडे सुपूर्द केली. खासदार व आमदार असतानाही ते गरीबांच्या झोपडीत जाऊन जेवण करीत. सर्वसामान्य राहणी व सर्वसामान्य शेतकर्‍यांत मिसळून राहणे हे दादा पाटील यांचे वैशिष्ट्य होय. शनिवारी दुपारी खारे कर्जुने येथे त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होत   

No comments:

Post a Comment