जुगार अड्ड्यावर छापा; 1 लाखाचा मुद्देमाल जप्त - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, November 23, 2019

जुगार अड्ड्यावर छापा; 1 लाखाचा मुद्देमाल जप्त

जुगार अड्ड्यावर छापा; 1 लाखाचा मुद्देमाल जप्त


कोतवाली पोलिसांची कारवाई; 17 जण ताब्यात
नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः  कोतवाली पोलिसांनी धकेबाज कामगिरी केली आहे. कायनेटिक चौक, इलाक्षी शोरूम मागे, यशोधन हॉटेल जवळ एका खोलीत स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता तिरट नावाचा जुगार खेळणार्‍या 17 जणांना पकडले. यावेळी जुगाराच्या साहित्यासह 1 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांना गोपनीय खबर्‍यामार्फत माहिती मिळाली की इलाक्षी शोरुमचे मागे, यशोधन हॉटेलजवळ, एका खोलत तिरट नावाचा जुगार खेळ चालू आहे. या माहितीच्या आधारे त्यांनी या ठिकानी छापा टाकला. यामध्ये 17 आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्यावर महा.जु.का.कलम 4, 5 प्रमाणे पोकॉ शाहीद सलीम शेख, नेमणुक- कोतवाली पोलीस स्टेशन, यांनी फिर्याद दाखल केली. यामध्ये आरोपी बंडु मिठ्राव दारूनकर वय-43 रा.वाघमळा, सावेडीगाव. सुशांत संजय फुंदे वय-28 रा.सुर्यानगर, सनि पॅलेस, पोपट भानुदास मोरे वय-40 रा.अंबिका हॉटेलसमोर,केडगाव, ज्ञानेश्वर मन्छिंद्र दौडकर वयः 32 वर्षे रा. मारुती मंबिराजवळ, तोफखाना, मुकेश प्रताप कंडारे वय-31 रा. सर्जेपुरा, जेजेगलली, आरीफ मेहबुब शेख वय-42 वर्षे रा.शांती कंस्ट्रक्शन, गोंविदपुरा, श्रीकांत धोंडीराम फसले वय-33 वर्षे रा.दिपनगर, भुषणनगर, केडगाव, प्रशांत रामदास भुसारे वय- 27 वर्षे रा.कापरेमळा,केडगाव,
गणेश पोपट लॉढे वय-29 वर्षे रा.कापरेमळा, केडगान, अनिल वामोवर सातपुते वय-38 वर्षे रा.शाहूनगर, पारनेर जि.अहमदनगर. पोपट रामभाऊ औटी वय-58 वर्षे रा. सुतारगलली, पारनेर, इमाम इब्राहीम पठाण वय-62 वर्षे रा. अचना हॉटेलमागे केडगाव, मनोहर बिश्काथ कोडम वय-44 वर्षे रा.नित्यसेवा हासिंग सोसा, वसंत टेकडी, सावेडी, किरण बबनराव मुके वय-67 वर्षे रा.गणेशनगर, कलयाणरोड, सचिन सुरेश दिवाने वय-33 वर्षे रा.साईराम सोसा, कलगाणरोड, राविन काशिनाथ उदगीरकर वय-36 वर्षे रा. बालीकाश्रम शाळेच्यमागे,बालीकाश्रम रोड, विजय ज्ञानदेव गायकवाड वय-30 वर्षे रा.बोहरीचाळ, रेलवेस्टेशन,कायनेटीक चौक, हे इलाक्षी शोरुमचे मागे, यशोधन हॉटेलजवळ, एका खोलत तिरट नावाचा जुगार खेळ असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून 1,35,300 रुपये त्यात 10,300 रुपये रोख रक्कम व 1,25,000 रुपयांचे मोबाईल व एक करीझमा मोटारसायकल व तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळण्यासाठी लागणारे पत्ते, जुगाराचे साहित्य आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला.

No comments:

Post a Comment