पालकमंत्री राम शिंदे ‘खतरे’मे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, October 18, 2019

पालकमंत्री राम शिंदे ‘खतरे’मे

पालकमंत्री राम शिंदे ‘खतरे’मे 

पंकजा मुंडे , आशिष शेलार , राम शिंदे यांना ही निवडणूक अवघड जाणार असल्याचा अंदाज भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत व्यक्त केल्याचे म्हंटले आहे

ुंबई : भारतीय जनता पार्टी अंतर्गत सर्वेनुसार राज्यात  भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे . हाती आलेल्या माहितीनुसार  164 जागांपैकी  भाजपने 122 जागांवर विजय निश्चित मानला आहे. तर 40 जागांवर अटीतटीची लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे  तर 2 मतदारसंघात भाजपचा पराभव होणार, असा अदाजं या अंतर्गत सर्वेनुसार माहिती भाजपमधील सूत्रांनी दिल्याचे वृत्त एबीपी ने दिले आहे

भाजपाच्या या सर्व्हेनुसार बारामती आणि  मालेगाव या दोन मतदार संघामध्ये भाजपचा पराभव होणार आहे. बारामतीत अजित  पवार निवडणक  जिंकतील तर मालेगाव मध्ये विद्यमान  आमदार आसीफ शेख जिंकतील असा अंदाजं वर्तवण्यात आला आहे. दरम्यान ही  निवडणकू भाजपच्या  40 उमेदवारांसाठी  खडतर आहे. या मध्ये चार विद्यमान मंत्र्यांचा समावेश आहे .  महिला आणि बालविकास मंत्री  पंकजा मुंडे याना  परळी मतदारसंघात त्यांचे  चुलत बंधू धनंजय मुंडे यांच्याकडून मोठे आव्हान मिळत आहे
 याचबरोबर शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार  यांना वांद्रे पश्चिम  मतदारसंघात काँग्रेसचे आसिफ झकेरिया यांचेकडून जोरदार लढत मिळतेय ,  असा अदाजं भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत करण्यात आला आहे  तसेचमंत्री  रामशिंदे याना कर्जत -जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या  रोहित  पवारयांच्यात नातितटीची लढत अपेक्षित आहे

No comments:

Post a Comment