तोफखाना परिसरात आ.संग्राम जगताप यांच्या प्रचार फेरीला मोठा प्रतिसाद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, October 18, 2019

तोफखाना परिसरात आ.संग्राम जगताप यांच्या प्रचार फेरीला मोठा प्रतिसाद

तोफखाना परिसरात आ.संग्राम जगताप यांच्या प्रचार फेरीला मोठा प्रतिसाद

अहमदनगर ः   विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ नगर शहर मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांनी  नगर शहरातील प्रत्येक मतदार पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला असून एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या तोफखाना आणि बोल्हेगाव या परिसरात झंझावाती प्रचार फेरी काढली. या फेरीला प्रचंड प्रतिसाद लाभला. विशेष म्हणजे शिवसेनेच्या अनेक जुन्या कार्यकर्त्यांनी या प्रचार फेरीत सहभाग घेतला.

यावेळी मतदारांशी संवाद साधताना आ.संग्राम जगताप म्हणाले, नगर शहरातील यापुर्वीच्या निवडणुका पाहिल्या तर प्रत्येकवेळी निवडणूक जवळ आली की खोट्या अफवा पसरविल्या जायच्या, त्या अफवांवर भावनिक आवाहन करत विकासाच्या मुद्याला सोयीस्कररित्या बगल दिली जायची. त्यामुळे 25 वर्षे नगर शहर विकासाबाबत मागे राहिले. मात्र हा विकासाचा बॅकलॉग भरुन काढण्यासाठी आपण गेल्या 5 वर्षांपासून प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. शहराचा सर्वांगीण विकास हाच ध्यास घेऊन शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. पुढील पाच वर्षामध्ये अधिक जोमाने काम करून नगर शहराची वाटचाल महानगराकडे करणार आहे.त्यामुळे पुन्हा एकदा संधी द्यावी असे आवाहन आ.संग्राम जगताप यांनी यावेळी मतदारांना केले.
तोफखाना परिसरात काढण्यात आलेल्या प्रचार फेरीच्या वेळी माजी उपमहापौर दीपक सूळ, शिवसेनेचे माजी उपशहरप्रमुख राजेंद्र बोगा, दिलदारसिंग बीर, आरिफ शेख, प्रशांत धलपे, नानासाहेब बत्तीन, सारंग पंधाडे, यशवंत सुरकुटला, शरद क्यादर, अरविंद चन्ना, निखील धंगेकर, सौरभ वाघ, संदीप जाधव, किरण दाभाडे, अंकुश मोहिते, संजय दिवटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
तर बोल्हेगाव परिसरात नगरसेवक कुमार वाकळे यांनी केलेल्या विकासकामांमुळे आणि संघटन बांधणीमुळे येथील शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला आहे.

No comments:

Post a Comment