महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणारी घटना; अजित पवार घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, July 2, 2023

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणारी घटना; अजित पवार घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ.

 महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणारी घटना; अजित पवार घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ.


राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार मागील काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. आज सकाळपासून अजित पवारांच्या देवगीरी बंगल्यावर अजित पवार समर्थक आमदारांची बैठक सुरू होती. या बैठकीनंतर अजित पवार राजभवनावर दाखल झाले आहेत. त्यामुळे अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

राष्ट्रवादीचे 9 आमदार मंत्री पदाची शपथ घेवू शकतात, राष्ट्रवादीचे 30 आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत. या 30 आमदारांच्या सह्यांचे पत्र अजित पवार राज्यपालांना देणार आहेत.

No comments:

Post a Comment