माळीवाडा येथे महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्याबाबत आयुक्त डॉ.पंकज जावळे म्हणाले.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 15, 2023

माळीवाडा येथे महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्याबाबत आयुक्त डॉ.पंकज जावळे म्हणाले..

 माळीवाडा येथे महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्याबाबत आयुक्त डॉ.पंकज जावळे म्हणाले..


नगर :
माळीवाडा येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यासाठीच्या आराखडा बाबत आयुक्त डॉ.पंकज जावळे व कृती समितीचे सदस्य यांच्यात चर्चा झाली असून यावेळी आर्किटेक समीर घायाळ यांनी जो आराखडा सादर केला त्यात काही बदल करण्याच्या सूचना आयुक्त व कृती समितीच्या वतीने करण्यात आल्या. शहरात महापुरुषांच्या विचाराची पायाभरणी होण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचा भव्यदिव्य पुर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे, गेल्या अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न आमदार संग्राम जगताप व आयुक्त डॉ.पंकज जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गी लागणार आहे. कृती समितीच्या वतीने प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा सुरु असून आयुक्त डॉ.पंकज जावळे या काम तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचा इतिहास समाजाला खर्‍या अर्थाने प्रेरणादायी आहे. आजच्या युवा पिढीने त्यांचा आदर्श अंगीकारावा यासाठी माळीवाडा वेस येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा एकत्रित पुर्णाकृती  पुतळ्याची उभारणी करण्यात येणार आहे. तसेच वेस परिसरातील सुशोभीकरणाचे कामही हाती घेतले जाईल अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
माळीवाडा येथे महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्याबाबत आयुक्त डॉ.पंकज जावळे व कृती समितीची बैठक पार पडली. यावेळी प्रा.माणिकराव विधाते, माजी उपमहापौर अनिल बोरुडे,शहर अभियंता मनोज पारखे, इंजि. श्रीकांत निंबाळकर, अशोक कानडे, पंडितराव खरपुडे, अनंत गारदे, आर्किटेक समीर घायाळ, ज्ञानेश्वर रासकर, विष्णुपंत म्हस्के, भारत गारुडकर, श्रीकांत शिंदे, आनंद पुंड, अशोक गोरे, बेबीताई गायकवाड, संतोष हजारे, रेणुका पुंड, अनिल बोरुडे, संजय गारुडकर, प्रा.स्वाती सुडके, जालिंदर आळकुटे, बजरंग भूतारे, मळू गाडळकर, आदी उपस्थित होते. यावेळी कृती समितीच्या सदस्यांनी विविध सूचना केल्या.

No comments:

Post a Comment