मुंबई मधील घटना; लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून मृतदेहाचे तुकडे... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 8, 2023

मुंबई मधील घटना; लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून मृतदेहाचे तुकडे...

 मुंबई मधील घटना; लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून मृतदेहाचे तुकडे...


मुंबई -
मुंबईतील मिरा रोडमध्ये लिव इन रिलेशनशिपमध्ये राहणार्‍या आपल्या रुम पार्टनरची निघृण हत्या करुन तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करुन विल्हेवाट लावण्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतदेहाचे तुकडे करून आरोपी ते तुकडे कुकरमध्ये टाकायचा, ते उकळायचा त्यानंतर मग मिक्सरमध्ये बारीक करायचा. हे तुकडे पिशवीत भरून इमारतीच्या मागे असलेल्या गटारात फेकून द्यायचा. यासाठी तो त्याच्या बाईकचा वापर करत असे. गुन्ह्यासाठी वापरलेलं सगळं सामान आणि बाईक काल रात्री पोलिसांनी जप्त केलं आहे.
या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेले सर्व साहित्यही पोलीसांनी जप्त केले आहेत. मनोज साने (56 वर्ष) असं या आरोपीचं नाव आहे, तर सरस्वती वैद्य असं मृत महिलेचं नाव आहे. ती 32 वर्षांची होती.
मीरा भाईंदर येथे उड्डाणपूलाच्या शेजारी गीता आकाशदीप नावाची सोसायटी आहे. तेथील हा सर्व प्रकार आहे. पोलिसांनी आरोपीली अटक केली आहे. हत्या आणि पुरावे नष्ट केल्याचे गुन्हे देखील त्याच्यावर दाखल करण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment