नगर- जामखेड रोडवरील घटना..टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, May 26, 2023

नगर- जामखेड रोडवरील घटना..टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू.

नगर- जामखेड रोडवरील घटना.. टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू.
नगर - टेम्पोने रस्त्याने पायी जाणार्‍या दोन महिलांना धडक देऊन समोरून आलेल्या दुचाकीलाही धडक दिली. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून दुसर्‍या महिलेसह दुचाकीवरील पती-पत्नी व त्यांचा मुलगा जखमी झाला आहे.
बुधवारी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास नगर- जामखेड रोडवरील निंबोडी शिवारात हा अपघात झाला. या प्रकरणी जखमी सपना सुरज शेंडगे (वय 22 रा. लक्ष्मीनगर, निंबोडी) यांनी भिंगार कॅम्प पोलिसांना दिलेल्या जबाबावरून टेम्पोवरील अनोळखी चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वत्सलाबाई भानुदास चांदणे (रा. निंबोडी) असे मयत महिलेचे नाव आहे. शकुंतला विजय चांदणे, फिर्यादी सपना शेंडगे, त्यांचे पती सुरज जगन्नाथ शेंडगे व मुलगा दक्ष सुरज शेंडगे हे जखमी झाले आहेत.

No comments:

Post a Comment