शहरात पावसाळ्यापूर्वी सर्व स्तरावर उपाययोजना करून सज्ज रहा - आयुक्त डॉ.पंकज जावळे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, May 25, 2023

शहरात पावसाळ्यापूर्वी सर्व स्तरावर उपाययोजना करून सज्ज रहा - आयुक्त डॉ.पंकज जावळे.

 शहरात पावसाळ्यापूर्वी सर्व स्तरावर उपाययोजना करून सज्ज रहा - आयुक्त डॉ.पंकज जावळे.

मनपा आपत्कालीन व्यवस्थापन बैठक संपन्न. 


नगर :
अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी आपत्कालीन व्यवस्थापन समितीची बैठक बोलवून सर्व अधिकार्‍यांना सूचना देत सांगितले की, शहरांमध्ये पावसाळ्यापूर्वी सर्व स्तरावर उपाययोजना करून सर्वांनी सज्ज राहावे जेणेकरून कुठलीही दुर्घटना घडणार नाही असे आदेश मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे यांनी दिले.
मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे म्हणाले की, नगर शहरातील ओढे नाले साफ करून पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग मोकळा करून द्या. याचबरोबर शहरातील गटारींची स्वच्छता करावी. जेणेकरून पाणी तुंबणार नाही. पावसाळ्यापूर्वी औषध फवारणीची तयारी करून ठेवा. जेणेकरून कुठली रोगराई पसरणार नाही. शहरातील खराब चेंबरचा सर्व्हे करून घ्यावा व तातडीने दुरुस्तीचे काम मार्गी लावावे. धोकादायक इमारतींचा सर्व्हे करून त्या उतरून घ्यावे व त्या ठिकाणी सूचनाफलक लावावे पालिकेच्या सर्वच विभागाने सज्ज राहावे असे ते म्हणाले.
यावेळी शहर अभियंता मनोज पारखे, नगर रचनाकार राम चारठणकर, नगर सचिव तडवी, अतिक्रमण विभाग प्रमुख सुरेश इथापे, अग्निशामक दल प्रमुख शंकर मिसाळ, प्रभाग अधिकारी मेहर लहारे, घनकचरा विभाग प्रमुख किशोर देशमुख, प्रभाग अधिकारी नाना गोसावी, रमेश कोतकर, अशोक साबळे, प्रसिद्धी प्रमुख शशिकांत नजान, डॉ.दळवी, आदी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment