बच्चू कडू यांना मिळाला मंत्रिपदाचा दर्जा! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 24, 2023

बच्चू कडू यांना मिळाला मंत्रिपदाचा दर्जा!

 बच्चू कडू यांना मिळाला मंत्रिपदाचा दर्जा!


मुंबई : 
गेल्या काही दिवसापासून राज्यात घडणाऱ्या राजकीय घटनातून मंत्रीमंडळ विस्तार लवकर होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र दि. २४ मे रोजी अखेर मंत्रीमंडळ विस्तारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आमदार बच्चू कडूंना मंत्रीपदाचा दर्जा जाहीर करण्यात आला आहे.

दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष म्हणून बच्चू कडू यांची निवड केली आहे. याबाबतीत शासनाने परिपत्रक देखील काढले आहे.गेल्या वीस वर्षांपासून बच्चू कडू दिव्यांगांसाठी लढा देत आहेत. त्यामुळेच दिव्यांग कल्याण खात्याचे अभियान दिव्यांगांपर्यंत पोहचवण्यासाठी बच्चू कडूंना मंत्रिपदाचा दर्जा दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.

No comments:

Post a Comment