तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्मह्त्या. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 29, 2023

तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्मह्त्या.

 तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्मह्त्या.


कळमनुरी तालुक्यातील घोळवा शिवारात रविवारी ता. 28 दुपारी भर पावसात एका तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. धोंडबा नारायण डुकरे (45 रा. नरवाडी) असे मयत शेतकऱ्याचे नांव असल्याचे पोलिसांनी सांगितले. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील नरवाडी येथील शेतकरी धोंडबा डुकरे यांची घोळवा शिवारात सुमारे 5 एकर शेती आहे. सर्व शेती आईच्या नावे असून मागील काही वर्षापासून धोंडबा हेच शेती पाहतात. आज दुपारी ते शेतात कामासाठी गेले होते. त्यानंतर दुपारी पाऊस सुरु असतांनाच त्यांनी घोळवा शिवारात एका शेतात झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

या प्रकाराची माहिती परिसरातील शेतकऱ्यांना कळाल्यानंतर त्यांनी तातडीने कळमनुरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक रेखा शहारे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार देविदास सुर्यवंशी, पोले, शिवाजी इंगोले, गजानन होळकर, प्रशांत शिंदे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या घटनेची माहिती नरवाडी येथे धोंडबा डुकरे यांच्या कुटुंबियांनाही दिली. मात्र त्यांची पत्नी बाहेरगावी गेल्यामुळे सायंकाळी उशीरा पर्यंत त्या घटनास्थळी पोहोचल्या नव्हत्या. मयत धोंडबा यांच्या पश्‍चात आई, पत्नी, चार मुली, एक मुलगा व भाऊ असा परिवार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. दरम्यान, मयत धोंडबा यांनी नेमके कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात सायंकाळी उशीरापर्यंत नोंद झाली नव्हती.

No comments:

Post a Comment