"राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीचे"अहमदनगर जिल्हा ग्रामीण या पदावर गणेश सावंत यांची वर्णी ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 20, 2023

"राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीचे"अहमदनगर जिल्हा ग्रामीण या पदावर गणेश सावंत यांची वर्णी !

ग्राहकांच्या हितासाठी पारदर्शक कार्य करत या पदाला न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत रहा ! आ.निलेश लंके 

 "राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीचे"अहमदनगर जिल्हा ग्रामीण या पदावर गणेश सावंत यांची वर्णी !

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जागतिक ग्राहक दिन मोठया जल्लोषात साजरा ...


पारनेर -
ग्राहकांच्या न्याय हक्कासाठी ग्राहक सौरक्षण समीतीच्या माध्यमातून ग्राहकांना मदत व्हावी . या उद्देशाने ग्राहक संरक्षण समीतीची स्थापना झाली असून .राष्ट्रवादी काँग्रेस ग्राहक संरक्षण समितीमध्ये पारनेर तालुक्याचे सुपुत्र श्री . गणेश सावंत यांची जिल्हा ग्रामीण अध्यक्ष म्हणून वर्णी लागली आहे.
बुधवारी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशच्या आयोजनात जागतिक ग्राहक दिन मोठया जल्लोषात साजरा करण्यात आला .राष्ट्रवादी प्रदेश कार्यालय ,मुंबई येथे झालेल्या दिमागदार सोहळ्यात जागतिक ग्राहक दिनाच्या दिवशी राज्यस्तरीय प्रमुख पदाधिकारी यांचा मेळावा व पद नियुक्तीचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री. जयंतराव पाटील,श्री. बसवराज पाटील सर्व सेलचे निरीक्षक  मा.श्री घनश्याम शेलार , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीचे प्रदेशाध्यक्ष मा.मंत्री श्री.सूर्यकांत गवळी , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते श्री.महेश चव्हाण, मा.प्रबंधक ग्राहक आयोग व वैद्य मापन मा.श्री. बाळासाहेब झावरे, विजय देसाई (अध्यक्ष मुंबई विभाग ) यांच्या सह राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीचे जुने नवे पदाधिकारी यांच्या सह अनेक मान्यवर मंडळीच्या उपस्थितीमध्ये जागतिक ग्राहक दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमामध्ये राज्यस्तरी महिला व पुरुष पदाधिकारी यांच्या  नियुक्ती केल्या गेल्या.  या कार्यक्रमाच्या वेळी महाराष्ट्र स्तरातून सर्व विभागीय अध्यक्ष तसेच महाराष्ट्र उपाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांच्या निवडी केल्या गेल्या . महाराष्ट्रातून संपूर्ण पदाधिकारी महिला पुरुषांसह खूप मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.लक्ष्मणजी चव्हाण व ॲड.सौ.अनिता सूर्यकांत गवळी यांनी केले तर आभार मा.दिलीप आबा भोसले यांनी मानले . मा.मंत्री व ग्राहक संरक्षण समितीचे प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत गवळी यांनी मान्यवरांसह सर्व कार्यकर्त्यांची ग्राहक प्रतिज्ञा घेतली .
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अंतर्गत "राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीचे" कार्यक्षेत्र हे संपुर्ण महाराष्ट्र राज्य असुन. “राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीने” आपली पक्षनिष्ठा, इच्छाशक्ती, सेवाभावी वृत्ती व ग्राहक चळवळीत काम करण्याची आवड विचारात घेऊन पिंपळनेर येथील श्री. गणेश सावंत यांना आपण या पुढील काळात ग्राहक चळवळीची आवड लक्षात घेता,स्वइच्छेने काम करणारे कार्यकर्ते सोबत घेऊन,त्यांच्या बरोबर विचार विनिमय करून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी मधील वरिष्ठांशी सुसंवाद साधुन, राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीने ठरवुन दिलेल्या रचनात्मक कामाची पध्दत,नियम व सुचना नुसार काम करुन, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समिती वाढविण्याचा प्रयत्न करावा व प्रामाणिक व निष्ठावंत कार्यकर्ते यांना बरोबर घेऊन कार्य करावे. व हे करत आसताना,आपल्या कामाचा आढावा वेळच्या वेळी प्रदेश मुख्य कार्यालयाकडे सातत्याने व नियमीतपणे पाठवावा.असाही उल्लेख सदर नियुक्ती पत्रात करण्यात आला आहे.
आपल्या संघटनात्मक व ग्राहक संरक्षण समितीच्या यापूर्वी केलेल्या कामाची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ( तात्या ) फाळके यांनी केलेली शिफारस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गणेश सावंत यांची केलेली निवड व कौतुकास्पद आहे .कष्ट करणाऱ्या व पक्षाचे संघटन मजबूत करणाऱ्या व्यक्तीला पक्षांनी न्याय दिला आहे .असे आमदार निलेश लंके व पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे मा.अध्यक्ष अशोकराव सावंत यांनी सांगितले.
गणेश सावंत यांच्या झालेल्या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पारनेर तालुक्यातील सर्व पदाधिकारी व हितचिंतकांकडून सावंत यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment