...या ठिकाणी शेतात गेलेल्या बाप-लेकाचा विजेचा शॉक लागून मृत्यू. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 7, 2023

...या ठिकाणी शेतात गेलेल्या बाप-लेकाचा विजेचा शॉक लागून मृत्यू.

 शेतात गेलेल्या बाप-लेकाचा विजेचा शॉक लागून मृत्यू.उस्मानाबाद :
 शेतातील ज्वारीला पाणी देण्यासाठी विद्युत मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या पिता-पुत्राचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. ही घटना तुळजापूर तालुक्यातील मौजे निलेगाव येथे घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर तालुक्यातील मौजे निलेगाव येथील शरणाप्पा अर्जुन जमादार , गणेश जमादार हे दोघे निलेगाव शिवारातील गट नंबर ८ मधील शेतात ज्वारीला पाणी देण्यासाठी गेले होते. तेव्हा विद्युत मोटार सुरू करण्यासाठी मोटारीचे बटण दाबताच शरणाप्पा अर्जुन जमादार (वय ५२ वर्षे), गणेश जमादार (वय १६) वर्षे यांना तीव्र धक्का लागून दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच इटकळ औट पोस्ट येथील पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांकडून घटनेचा पंचनामा करण्यात आला आणि नळदुर्ग पोलीस स्टेशन येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. 

No comments:

Post a Comment