अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून अ‍ॅसिड टाकण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस अटक. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 4, 2023

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून अ‍ॅसिड टाकण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस अटक.

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून अ‍ॅसिड टाकण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस अटक.


अमरावती‎ - शाळेत जात असलेल्या‎ एका १५ वर्षीय विद्यार्थीनीचा पाठलाग‎ करुन २१ वर्षीय तरुणाने हात पकडला.‎ त्यामुळे मुलगी घाबरली व ओरडली.‎ त्यावेळी या तरुणाने मुलीला अॅसिड‎ टाकून मारुन टाकण्याची धमकी‎ दिली. मुलीने‎ दिलेल्या तक्रारीवरून परतवाडा‎ पोलिसांनी या २१ वर्षीय तरुणाविरुद्ध‎ गुन्हा दाखल‎ करुन त्याला तत्काळ अटक केली‎ आहे. शेख मोबीन ऊर्फ आरिफ मो.‎ मतीन (२१, रा. हबिबनगर, परतवाडा)‎ असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे‎ नाव आहे. परतवाडा पोलिस‎ ठाण्याच्या हद्दीत राहणारी एक मुलगी‎ २ फेब्रुवारीला सकाळी साडेदहा‎ वाजताच्या सुमारास शाळेत पायी जात‎ होती.

त्यावेळी शेख मोबीन हा मुलीचा‎ पाठलाग करत तिच्या मागे आला.‎ त्यानंतर पिडीत मुलीने शाळेत परीक्षा‎ दिली व दुपारी अडीच वाजताच्या‎ सुमारास ती रस्त्याने घराकडे पायी‎ जात असताना त्याने पुन्हा मुलीचा‎ पाठलाग केला. यावेळी शेख मोबीनने‎ भर रस्त्यात तरुणीचा हात पकडला.‎ या प्रकाराने मुलगी घाबरली व जाेरात‎ ओरडली. त्यामुळे शेख मोबीनने‎ तिला त्याच ठिकाणी धमकी दिली‎ की, ओरडली तर अॅसिड टाकून‎ मारुन टाकेल. या प्रकाराने मुलगी‎ अधिकच घाबरली. या प्रकाराबाबत‎ मुलीने घरी जाऊन कुटूंबियांना‎ माहिती दिली. तक्रारीची तत्काळ‎ दखल घेवून पोलिसांनी त्याला बेड्या‎ ठोकल्या.‎


No comments:

Post a Comment