प्रभाग क्र.8 बालाजी सोसायटी येथील अंतर्गत रस्त्याच्या कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, February 9, 2023

प्रभाग क्र.8 बालाजी सोसायटी येथील अंतर्गत रस्त्याच्या कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ.

 प्रभागाच्या सर्वांगिण विकासासाठी मुलभुत सुविधांवर भर - महापौर रोहिणी शेंडगे.

प्रभाग क्र.8, बालाजी सोसायटी येथील अंतर्गत रस्त्याच्या कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ.


नगर -  
कल्याण रोड परिसराच्या विकासासाठी विविध निधीची उपलब्धता करुन देत अनेक विकास कामांना प्राधान्य दिल्याने अनेक कामे मार्गी लागत आहेत. वाढत्या वसाहतींना सर्वोतोपरि सुविधा देण्यासाठी नगरसेवक कटीबद्ध आहेत. नागरिकांना सर्व सुविधा मिळण्यासाठी ड्रेनेज, रस्ता, स्ट्रीट लाईट आणि महत्वाचे म्हणजे पाणी आदि सुविधांवर भर दिला जात आहे. या भागाच्या सर्वांगिण विकासात नागरिकांचे सहकार्य मिळत असल्याने कामे पुर्णत्वास येत आहे. शहरातील प्रत्येक भागात विकास कामे मार्गी लागत असल्याने शहर विकसित होत आहे. चांगल्या सुविधा असल्यास त्याचा इतर अनेक गोष्टींसाठी फायदा होत असल्याने शहराची विकासात्मक वाढ होत असल्याचे प्रतिपादन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले.
प्रभाग क्र.8 मध्ये महिला बाल कल्याणच्या सभापती पुष्पा बोरुडे, नगरसेवक सचिन शिंदे, नगरसेवक शाम नळकांडे यांच्या प्रयत्नातून कल्याण रोडवरील बालाजी सोसायटी येथील अंतर्गत रस्त्याच्या कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी नगरसेवक शाम नळकांडे, पुष्पा बोरुडे, सचिन शिंदे, माजी विरोधीपक्ष नेता संजय शेंडगे, लक्ष्मण साबळे, सुभाष गवते, दिनकर आघाव गुरुजी, अंकुश साबळे, सौ. राणी पवार, विमल निमसे, वैशाली नळकांडे, मनिषा नळकांडे, सुरेखा नळकांडे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी नगरसेवक शाम नळकांडे म्हणाले, प्रभागातील प्रत्येक भागात सर्व मुलभुत सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही सर्व नगरसेवक एकत्रित प्रयत्न करत आहेत. महापौरांच्या सहकार्याने या भागातील अनेक कामे मार्गी लागत आहेत. यापुढेही अशी विविध कामे पुर्णत्वास येतील. नागरिकांच्या मागणीनुसार त्या-त्या भागातील कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले.
याप्रसंगी पुष्पाताई बोरुडे, सचिन शिंदे आदिंनीही प्रभाग क्र. 8 हा मोठा असल्याने प्रत्येक भागात जास्तीत जास्त विकास कामे करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास पूजा भंडारे, शिला जाधव, सुनिता गीते, वल्लाकट्टी विनाबाई, आशा पावके, लक्ष्मी सामल, सुषमा मिसाळ, रुपाली ढाकणे, अंजली घोडेस्वार, सविता कोडम, रोहिणी शिंदे, येमूल आक्का, संगीता शिंदे, लक्ष्मी मुत्तल, कोडम आजी, अनिता शिंदे, मथाबाई असलकर, दळवे ताई, द्रोपदी भोसले, शारदा जाधव, रेणुका न्यालपेल्ली, शामा गुंडू, प्रेमचंद चौधरी, अशोक असलकर, इरेशम जंगम, चंद्रकांत तपपिरे, दत्तात्रय शिंदे, सुनिल मुत्याल, अंबादास मुत्याल, अशोक सुरसे, बाळू राऊत, नाविद शेख, संतोष येमूल, संतोष पवार, बल्लाळ नागुल, राजेंद्र गीते, शिवाजी गीते, समाधान गीते, मारुती गीते, पांडुरंग मोरे, रविंद्र दासरी, लहू गर्जे, किशोर घोडके, विनोद राठोड, गणेश सुंदूपटला, शशिकांत पवार, कृष्णा सामल, सतिश शिंदे, अजित अस्तगावकर, ज्ञानेश्वर विंचूरकर, बाबुलाल गुंडू, दीपक गलगले, रवि बागडे, संजू साकुरे, मच्छिंद्र कोठुळे, सुशांत शिंदे, विकास ताकपिरे, कृष्णा शिंदे, ओंकार दिकोंडा, ज्ञानेश्वर गुंडू, अक्षय असलकर, राहुल असलकर, राहुल भोसले, भूषण तिरमल, अनिकेत शिंदे, अभय मुदगल, अनिस शेख, रोहित शिंदे, सौरभ क्षीरसागर, ओंकार पवार, हरी सांगळे, चिंतामणी मॅडम,  देवगुणे मॅडम आदिंसह नागरिक उपस्थित होते. शेवटी सुशांत शिंदे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here