भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी घेतली राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांची भेट. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, January 12, 2023

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी घेतली राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांची भेट.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी घेतली राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांची भेट.
मुंबई - भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, माजी मंत्री आणि आपले चुलत भाऊ धनंजय मुंडे यांची मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या वेळी पंकजा आणि धनंजय यांच्यावर विविध विषयावर चर्चा देखील झाली. काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे हे परळीकडे जात असताना रात्री त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. यात मुंडे हे जखमी झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून मुंबईला हलवण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment