22 वर्षीय तरुणी विष प्राशन करून झाली.. रुग्णालयात स्वतः दाखल. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, January 10, 2023

22 वर्षीय तरुणी विष प्राशन करून झाली.. रुग्णालयात स्वतः दाखल.

22 वर्षीय तरुणी विष प्राशन करून झाली.. रुग्णालयात स्वतः दाखल.


परभणी :
 एका बावीस वर्षीय तरुणीने गावामध्ये विष प्राशन केल्यानंतर स्वतः उपजिल्हा रुग्णालयामध्ये चालत येऊन आपण विष प्राशन केले असल्याची माहिती डॉक्टरांना दिली आहे. ही घटना परभणीच्या सेलू तालुक्यातील रावळगाव येथे घडली आहे. दरम्यान उपचार सुरू असताना २२ वर्षीय तरुणी बेशुद्ध पडली असल्यामुळे तरुणीचे नाव आणि तिने कोणत्या कारणाने विष प्राशन केले आहे, याची माहिती समजू शकलेली नाही.
परभणीच्या सेलू तालुक्यातील रावळगाव येथील एका बावीस वर्षीय तरुणीने गावामध्ये विष प्राशन केले. त्यानंतर काही वेळातच सदरील तरुणीने सेलू शहर गाठले आणि उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल झाली. रुग्णालयात जात असतानाच तीची प्रकृती ढासळत होती. यावेळी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांना तरुणीने बोबडी वळत असताना आपण विष प्राशन केले असल्याची माहिती दिली. त्यामुळे डॉक्टरांनी तातडीने तरुणीवर उपचार सुरू केले. मात्र, उपचार सुरू असतानाच तरुणी बेशुद्ध पडली.
तरुणी बेशुद्ध पडल्याने डॉक्टरांनी सेलु उपजिल्हा रुग्णालयात तिच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी तरुणीला परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. उपचार सुरू असताना तरुण ही बेशुद्ध पडली असल्याने तरुणीने कोणत्या कारणाने विष प्राशन केले आहे आणि तरुणीचे नाव काय आहे, याची माहिती समजू शकलेली नाही. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. सध्या विष घेतलेल्या तरुणीवर परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here