शहरातील पाणीपुरवठा ‘हे दोन दिवस’ विस्कळीत. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 4, 2023

शहरातील पाणीपुरवठा ‘हे दोन दिवस’ विस्कळीत.

शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत.


अहमदनगर -
महावितरणच्या तीन दिवसीय संपामुळे काल मध्यरात्री शहर पाणीपुरवठा केंद्र वसंत टेकडी सह आरटीओ, सरोष पाण्याची टाकी या ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे टाक्यांमध्ये पाणी भरता न आल्याने आज उद्या रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती  भागास उदा. सिध्दार्थनगर, सर्जेपुरा, *तोफखाना, लालटाकी, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, ख्रिस्त गल्ली, आनंदी बाजार*, कापड बाजार माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर व सावेडी परिसर इत्यादी भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार असून या भागास गुरूवार ऐवजी शुक्रवार दि. 06/01/2023 रोजी करण्यात येणार आहे.
काल मध्यरात्री पासून अहमदनगर महानगरपालिकेच्या शहर पाणी पुरवठा केंद्र वसंत टेकडी सह आर.टी.ओ / सरोष पाण्याची टाकी येथील वीज पुरवठा बंद झालेला होता. वीज पुरवठा सुरू करणे बाबत वीज वितरण कंपनीचे कर्मचारी / अधिकारी यांना महानगरपालिके कडून वारंवार संपर्क करूनही त्यांचे कडून प्रतिसाद मिळत नव्हता. तसेच त्यांचे वसंत टेकडी येथील स्थानिक कार्यालयही बंद होते. वांरवार विनंती केले नंतर अखेर आज सकाळी 9.30 वाजता वीज वितरण कंपनी कडून बंद पडलेला वीज पुरवठा सुरू झालेला आहे.परंतू पाणी पुरवठा मुख्य केंद्र वसंत टेकडी व आर.टी.ओ / सरोष पाण्याची टाकी येथील वीज पुरवठा सलग 9 ते 10 तास बंद राहिल्याने वसंत टेकडी येथील उपनगर भागासाठी पाणी वाटपा करिताची उंच टाकी, व शहराच्या मध्यवर्ती भागासाठी पाणी पुरवठा होत असलेली आर.टी.ओ टाकी व सरोष उंच पाण्याच्या टाक्या भरता आलेल्या नाहीत. तसेच वसंत टेकडी येथून थेट विद्युत मोटारीद्वारे पाणी पुरवठा होत असलेल्या निर्मल नगर, लक्ष्मी नगर, तपोवन रोड परिसर, सूर्यनगर, मुकुंदनगर इत्यादी उपनगर भागाकरिताच्या कार्यरत मोटारी द्वारे वीज पुरवठया अभावी होणारा पाणी उपसा बंद होता.
शहरातील पाणी पुरवठा एक दिवस बंद करून उपनगरात ज्या भागात जास्त दिवसाचे रोटेशन आलेले अशा भागात पाणी पुरवठा करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने मंगळवार दि.03/01/2023 रोजी मध्यरात्री पासून 03 दिवस संप पुकारलेला असल्याने दरम्यान काळात खंडित वीज पुरवठयाचा नियमित पाणी उपश्यावर व वितरण व्यवस्थेच्या टाक्या निर्धारित वेळेत भरणेस विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी वीज वितरण कंपनीच्या कर्मचा-यांचे संपामुळे वीज पुरवठया बाबतची संभाव्य परिस्थिती विचारात घेता नागरीकांनी याची नोंद घेवून असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करून महानगरपालिकेस सहकार्य करावे. असे आवाहन मनपा प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment