भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना धनंजय जाधव यांचे पत्र. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, January 3, 2023

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना धनंजय जाधव यांचे पत्र.

 भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना धनंजय जाधव यांचे पत्र.

नाशिक पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी मिळावी.


अहमदनगर -
नाशिक पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी मिळावी अशी मागणी धनंजय जाधव यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचेकडे एका पत्राद्वारे केली आहे.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना लिहिलेल्या पत्रात धनंजय जाधव यांनी म्हटले आहे की, मी अहमदनगर शहरातील सामाजिक कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पक्षाचे अनेक वर्षांपासून काम करत आहे. माझी पत्नी विद्यमान नगरसेविका असून माझे कुटुंब गेल्या 40 ते 50 वर्षांपासून सक्रिय राजकारणात आहे. होऊ घातलेल्या नाशिक पदवीधर मतदार संघात गेल्या 1 वर्षांपासून नाशिक पदवीधर हक्क समितीच्या माध्यमातून नावनोंदणी केली आहे. मतदार संघातील शिक्षक कर्मचारी व सामान्य पदवीधारकांसाठी त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मी स्वतः वकील असल्यामुळे माझे संपूर्ण मतदारसंघात वकीलांशी व इतर सर्व क्षेत्रातील लोकांशी चांगले संबंध आहेत.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री अमितभाई शहा, पक्षाध्यक्ष जगतप्रकाशजी नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पा साहेब व खा. डॉ. सुजयदादा विखे पा यांच्या नेतृत्वाखाली पक्षवाढीचे कार्य करत आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाची मला संपूर्ण माहिती आहे. अहमदनगर जिल्ह्यातून सर्वात जास्त मतदार नोंदणी झालेली आहे मी नगर जिल्ह्यातला असल्याने मी नाशिक पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी करण्यास इच्छूक आहे. तरी पक्षाने माझ्या मागणीचा सकारात्मक विचार करावा. असेही जाधव यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here