32 वर्षीय मजुराने केला हनीट्रॅप गँगचा पर्दाफाश. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 22, 2022

32 वर्षीय मजुराने केला हनीट्रॅप गँगचा पर्दाफाश.

 32 वर्षीय मजुराने केला हनीट्रॅप गँगचा पर्दाफाश.

महिलेसह एक आरोपी गजाआड; 1 जण फरार.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः स्वतःचे व मुलीच्या अंगावरील कपडे काढून तरुणाला हनीट्रॅपच्या जाळ्यात ओढून लाख रुपये दे अन्यथा अत्याचाराचा गुन्हा दाखल करील अशी धमकी देणार्‍या महिलेला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ताब्यात घेतले असून, तिला अटक करण्यात आली आहे. तिच्यावर भादवि कलम 389, 504 आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आणखी एक आरोपी सतीष आयनर यासही पोलिसांनी ताब्यात घेतले असून दादासाहेब मस्के हा आरोपी फरार आहे.
सदर घटनेची हकीकत अशी की, बोल्हेगाव परिसरातील एका तरुणाला घरी बोलावून घेतल्यानंतर हनी ट्रॅप गँग मधील महिला व तिच्या साथीदारांनी हळूच दरवाजा बंद केला. बंद दरवाजाआड महिलेने स्वतःचे, तसेच मुलीचे कपडे काढत एक लाख रुपये दे नाही तर तुझ्यावर अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल करीन, अशी धमकी महिलेने तरुणाला दिली. मात्र, चतुर तरुणाने सुटका करून घेत थेट तोफखाना पोलिस ठाणे गाठून पोलिसांना सर्व हकीगत सांगितली. पुरूषाच्या फिर्यादीवरून एक महिला व दोन पुरूषाविरोधात गुन्हा दाखल केला.
या प्रकरणातील 32 वर्षीय पुरुष हा मजुरीचा व्यवसाय करत असून 20 डिसेंबर रोजी त्याच्या मोबाईलवरून त्याने एका अनोळखी नंबरवर फोन  करून मुली आहेत का ? असे विचारले समोरून त्या अनोळखी महिलेने त्याच्या नंबर वर व्हाट्सअप द्वारे मुलींचे फोटो पाठवले आणि भेटायचे असेल तर बोल्हेगावला ये असे सांगितले. त्यानंतर त्या अनोळखी महिलेने त्या पुरुषाला भेटण्यासाठी बोल्हेगाव येथील भरत बेकरी समोर बोलवले आणि आपल्या घरी नेले. तो 32 वार्षीय पुरुष त्या महिलेच्या घरात जाताच त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिलेने आणि एक अनोळखी तरुण आणि वयोवृद्ध पुरुषाने त्या 32 वर्षे तरुणास दमदाटी करण्यास सुरुवात केली व तू एक लाख रुपये अन्यथा तू आमच्या घरात घुसून अत्याचाराचा प्रयत्न केला असा गुन्हा दाखल करू अशी धमकी देण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्या पुरुषने आपल्याकडे पैसे नाहीत तेव्हा नंतर हा सौदा 80 हजार रुपयापर्यंत आला त्यालाही तो पुरुष तयार न झाल्याने अखेर त्या महिलेने 25000 रुपये तरी दे अन्यथा तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करावा लागेल असे म्हणून त्या महिलेने तीचे व तीच्या मुलीचे स्वता:च कपडे फाडु लागली हा सर्व प्रकार पाहून त्या 32 वर्षे तरुणाने त्या रूममधून कसेबशी आपली सुटका करून धूम ठोकली.

No comments:

Post a Comment