जामखेड दुहेरी हत्याकांडातील एका आरोपीस जन्मठेप, तेरा जण निर्दोष. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 28, 2022

जामखेड दुहेरी हत्याकांडातील एका आरोपीस जन्मठेप, तेरा जण निर्दोष.

 जामखेड दुहेरी हत्याकांडातील एका आरोपीस जन्मठेप, तेरा जण निर्दोष.


जामखेड ः
जामखेड येथील योगेश राळेभात व राकेश राळेभात यांची राजकीय वाद तसेच पोस्टर फाडल्याच्या रागातून साडेचार वर्षापूर्वी गोळ्या घालून हत्या झाली होती. याबाबत आज दि. 28 रोजी जिल्हा सत्र न्यायालयात अंतिम निकाल देत यातील एका आरोपीस जन्मठेपेची शिक्षा तर तेरा आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
मयत योगेश राळेभात व राकेश राळेभात हे साडेचार वर्षापूर्वी दि. 28 एप्रिल 2018 रोजी सायंकाळी बीड रोड छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर एका हॉटेल मध्ये चहा पीत असताना आरोपींनी गोळ्या घालून त्यांची हत्या केली होती.राजकीय वर्चस्व वादातून दुहेरी हत्याकांड झाल्यामुळे या खटल्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. सदर घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन या खटल्यात राज्य शासनाने विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव पाटील यांची नियुक्ती केली होती. श्रीगोंदा येथील जिल्हा सत्र न्यायाधीश एन. जी. शुक्ला यांच्या समोर खटल्याची सुनावणी पुर्ण झाली आज 28 रोजी अंतिम निकाल देण्यात आला.
आरोपी गोविंद दत्तात्रय गायकवाड यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर यातील विजय आसाराम सावंत, उल्हास विलास माने, कैलास विलास माने, प्रकाश विलास माने, काकासाहेब बबन गर्जे, दत्ता रंगनाथ गायकवाड, सचिन गोरख जाधव, विनोदकुमार सोमारिया रमिश, अशोक जाधव, अंकुश पप्पू कात्रजकर, गोरख दत्तात्रय गायकवाड, युवराज अभिमन्यू जाधव, धनाजी धनराज जाधव या तेरा आरोपांची निर्दोष मुक्तता झाली. खटल्यात सरकारी पक्षाने प्रत्यक्षदर्शीसह पोलीस अधिकारी आदी एकूण 32 साक्षीदारांची तपासणी केली. बचाव पक्षाने एकूण पाच साक्षीदार तपासले. राजकीय वर्चस्व वादातून हे दुहेरी हत्याकांड झाल्यामुळे या खटल्याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उमेशचंद्र यादव पाटील यांनी 17 ऑक्टोबर 2022 रोजी अंतिम लेखी युक्तिवाद न्यायालयासमोर मांडला. सदर खटल्याची सुनावणी पूर्ण झाली असून, आज बुधवार रोजी अंतिम निकाल देण्यात आला.

No comments:

Post a Comment