विवाहाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गुन्हा दाखल. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 28, 2022

विवाहाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गुन्हा दाखल.

 विवाहाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गुन्हा दाखल.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अल्पवयीन मुलीस विवाहाचे आमिष दाखवून तपोवन रोडवरील प्लॅटमध्ये अत्याचार करून हनी ट्रॅप च्या गुन्ह्यात अडकविण्याची व जिवे मारण्याची धमकी देणार्‍या बंटी भावेश राऊत उर्फ बंटी राऊत रा. लाटे गल्ली माणिक चौक अहमदनगर याच्या विरोधात आयपीसी अ‍ॅक्ट 1860 नुसार 376, 504, 506, 384 आणि बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 4, 6, 8 प्रमाणे तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस करत आहे.
या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची मुलगी आणि आरोपी बंटी राऊत यांची इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. त्यानंतर आरोपीने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून ’वेळोवेळी शहरातील तपोवन रोड येथे असणार्‍या आरोपीच्या एका फ्लॅटमध्ये अत्याचार केले.या प्रकरणाबाबत फिर्यादीला माहिती मिळाल्याने त्यांनी आरोपी बंटी राऊतकडे या संपुर्ण प्रकरणाची विचारणा केली असता आरोपीने फिर्यादीला जिवे मारण्याची तसेच हनी ट्रॅप प्रकरणात अहमदनगर शहरातील एसपी ऑफिस मध्ये खोटा गुन्हा दाखल करण्याची तसेच अल्पवयीन मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.

No comments:

Post a Comment