आम्ही लोकशाहीपद्धतीने बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 28, 2022

आम्ही लोकशाहीपद्धतीने बदला घेतल्याशिवाय राहणार नाही.

 आम्ही लोकशाहीपद्धतीने बदला घेतल्याशिवाय राहणार नाही.

अनिल देशमुखांच्या सुटकेवर आमदार रोहित पवारांचं सूचक विधान.


मुंबई ः
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आज कारागृहातून बाहेर आले आहेत. यावरून राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. तर विरोधकांकडून भाजपासह सत्ताधार्‍यांवर टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवरच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचं मोठं विधान समोर आलं आहे. राजकीय हितातून अनिल देशमुख यांना जो त्रास झाला, येत्या काळात आम्ही नक्कीच लोकशाही पद्धतीने त्याचा लोकांच्या हितासाठी आणि लोकशाही टिकावी यासाठी बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, असं रोहित पवार प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.
अनिल देशमुखांची सुटका खरंतर अगोदरच व्हायला हवी होती, ती झाली नाही, मात्र न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. त्यामध्ये ज्या पद्धतीने ईडी आणि सीबीआयवर ताशेरे ओढेलेले आहेत, हे सुद्धा आपण वाचलं पाहिजे. स्वत:ची चूक नसतानाही एका मोठ्या नेत्याला एवढा काळ तुरुंगात ठेवलं जातं. हे केवळ राजकीय दृष्टिकोनातून त्यांना अडचणीत आणण्यासाठीच, ठेवले असं रोहित पवार म्हणाले आहेत.

No comments:

Post a Comment