अनधिकृत गॅस रिफिलिंग सेंटरवर तोफखाना पोलिसांचा छापा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, November 26, 2022

अनधिकृत गॅस रिफिलिंग सेंटरवर तोफखाना पोलिसांचा छापा.

 अनधिकृत गॅस रिफिलिंग सेंटरवर तोफखाना पोलिसांचा छापा.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर-मनमाड रस्त्यावरील अनधिकृत गॅस रिफिलिंग करणार्‍या सेंटरवर तोफखाना पोलिसांनी छापा टाकून रिफिलिंगचे साहित्य व 6 गॅस सिलेंडर सह 23 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तोफखाना पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांना  माहिती मिळाली, की अहमदनगर-मनमाड महामार्गावर अनधिकृत गॅस रिफिलिंग सेंटर चालविले जात आहे. या माहितीच्या आधारे त्यांनी गुन्हे शोध पथकाला छापा टाकण्याचा आदेश दिला. या पथकाने शुक्रवारी (ता. 25) दुपारी सव्वाबारा वाजता छापा टाकला. या ठिकाणी आरोपी सिद्धांत शरद भिंगारदिवे हा एका साथीदाराच्या मदतीने गॅस रिफिलिंग सेंटर चालवीत असल्याचे आढळून आला. हिंदुस्थान पेट्रोलियम (एचपी) कंपनीची घरगुती वापराची सहा गॅस सिलिंडर आढळून आली. यातील काही सिलिंडर अर्धी भरलेली होती. रिक्षात हा गॅस भरण्यासाठी इलेक्ट्रिक मोटार आढळून आली. गॅस सिलिंडर आणि इलेक्ट्रिक मोटार असा 23 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस अंमलदार संदीप एकनाथ गिर्‍हे यांच्या फिर्यादीवरून आरोपी सिद्धांत भिंगारदिवे व त्याच्या साथीदारावर वस्तू कायदा, तसेच भारतीय दंड संहितेतील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment