हायप्रोफाइल वेश्या व्यवसायावर पोलीसांचा छापा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, November 26, 2022

हायप्रोफाइल वेश्या व्यवसायावर पोलीसांचा छापा.

 हायप्रोफाइल वेश्या व्यवसायावर पोलीसांचा छापा.

नेवासातील हॉटेल औदुंबर व नामगंगावर कारवाई.


नेवासा ः
नेवासा फाटा परिसरातील हॉटेल औदुंबर व हॉटेल नामगंगा या ठिकाणी चालणार्‍या हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायावर डीवायएसपी संदीप मिटके यांचे पथकाने बनावट गिर्‍हाईक पाठवून पंचांसह छापा टाकून पाच परप्रांतीय पीडित मुलींची सुटका करत अनैतिक व्यापारास प्रतिबंध कलमानुसार गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, काल दि.25/11/2022 रोजी संदीप मिटके यांना नेवासा फाटा परिसरात सेक्स रॅकेट चालवून बळजबरीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात आहे बाबत गुप्त बातमी मिळाली. त्यावरून नेवासा फाटा परिसरात हॉटेल औदुंबर व हॉटेल नामगंगा या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन पंचासमक्ष छापा टाकुन 5 पिडीत परप्रांतीय मुलींची सुटका करण्यात आली आहे. यावरुन आरोपी विक्रम बाळासाहेब साठे, वय 20 रा. जालना, अमोल नामदेव पैठणे वय 25 रा.मुकिंदपुर यांच्याविरुद्ध नेवासा पोलीस स्टेशन येथे महिला आणि मुलींचे अनैतिक व्यापारस प्रतिबंध अधिनियम कलम 3,4,5,7,8 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच वेळी दोन ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकण्यात आला. या कारवाईमुळे नेवासा फाटा परिसरात व शहरातील अवैध धंदे करणार्यांचे धाबे दणाणले आहे. सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक, स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप मिटके,  प्रताप दराडे, करे, मानिक चौधरीं, थोरात, मोंढे, राजेंद्र आरोळे, कउ औटी, पोलीस कॉन्स्टेबल इनामदार, पाखरे, विकास साळवे, सुहास गायकवाड, ठोंबरे, कुदळे, गुंजाळ, करंजकर, इनामदार, ङलि उंदरे व ङलि जाधव यांनी केली.

No comments:

Post a Comment