स्वतः गावठी कट्टे तयार करून विक्रीसाठी आलेला मध्य प्रदेशातील आरोपी गजाआड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, September 2, 2022

स्वतः गावठी कट्टे तयार करून विक्रीसाठी आलेला मध्य प्रदेशातील आरोपी गजाआड.

 स्वतः गावठी कट्टे तयार करून विक्रीसाठी आलेला मध्य प्रदेशातील आरोपी गजाआड.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तारकपूर बस स्टॅन्डवर सापळा लावला.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर शहरात मध्य प्रदेशातून गावठी कट्टे व जिवंत काडतुसे विक्रीसाठी आलेल्या रितेंद्र सिंह बरनाला (वय 22 वर्ष रा उमरती जिल्हा बडवानी मध्य प्रदेश) या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तारकपूर बस स्टॅन्ड येथे सापळा लावून ताब्यात घेतले असून त्याचेकडून चार गावठी बनावटी कट्टे, सोळा जिवंत काडतूसे असा एकूण 1,39,200 /- रु. किं.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जप्त करण्यात आलेल्या चार गावठी कट्टे व सोळा जिवंत काडतुसे या बाबत विचारपुस करता त्याने सर्व गावठी कट्टे मी स्वतः माझे मुळगांवी तयार करुन विक्री करण्यासाठी आणलेले आहेत अशी कबुली आरोपीने दिली आहे.
सदर घटनेची हकीकत अशी की, बी. जी. शेखर पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परीक्षेत्र, नाशिक व मनोज पाटील, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि / श्री. अनिल कटके, स्थागुशा अहमदनगर यांना आगामी गणेशोत्सव अनुषंगाने जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे विरुध्द जास्तीत जास्त कारवाई करणे बाबत  नमुद सुचना व मार्गदर्शना प्रमाणे अनिल कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर हे जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे याबाबत माहिती घेत असतांना गुप्त खबर्‍याकडून माहिती मिळाली कि, एक इसम गावठी कट्टे व जिवंत काडतसे विक्री करण्यासाठी अहमदनगर येथे तारकपुर एसटी स्टॅण्ड परिसरात येणार आहे. आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन मिळालेल्या बातमीनुसार खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले.
नमुद आदेशा प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोसई/सोपान गोरे, सफौ / राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, पोहेकॉ देवेंद्र शेलार, पोना विशाल दळवी, शंकर चौधरी, पोकॉ/ शिवाजी ढाकणे, आकाश काळे, मपोना/भाग्यश्री भिटे व ज्योती शिंदे अशांनी मिळून मिळालेल्या बातमीचे ठिकाणी तारकपुर बस स्टॅण्ड येथे जावून सापळा लावुन प्रवासी म्हणुन बसची वाट पाहत आहेत असा बनाव करुन थांबलेले असतांना थोड्याच वेळात एक संशयीत इसम पाठीवर काळ्या रंगाची सॅक घेवुन येताना दिसला. पोलीस पथकास संशय आल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी संशयीत इसमास ताब्यात घेवुन त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नावे 9) रितेंद्र सिंह बरनाला वय 22, रा. उमरती, जिल्हा बडवानी, राज्य मध्य प्रदेश हल्ली रा. धुलकोट, ता. भगवानपुरा, जिल्हा खरगोन, राज्य मध्य प्रदेश असे असल्याचे सांगीतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये
चार गावठी कट्टे पिस्टल व सोळा जिवंत काडतूसे विक्री करण्याचे उद्देशाने बेकायदेशिरित्या कब्जात बाळगताना मिळून आल्याने सदर बाबत सफी / राजेंद्र देवमन वाघ ने. स्थागुशा यांनी तोफखाना पोस्टे येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील कायदेशिर कार्यवाही तोफखाना पोस्टे करीत आहे.
सदरची कारवाई मनोज पाटील, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व श्री. अनिल कातकाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

No comments:

Post a Comment