जामखेड पंचायत समिती कार्यालय येथे गणेशोत्सव निमित्ताने आज शांतता कमिटी मीटिंग चे आयोजन.... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, August 27, 2022

जामखेड पंचायत समिती कार्यालय येथे गणेशोत्सव निमित्ताने आज शांतता कमिटी मीटिंग चे आयोजन....

 जामखेड पंचायत समिती कार्यालय येथे गणेशोत्सव निमित्ताने आज  शांतता कमिटी मीटिंग चे आयोजन....


जामखेड -
गणेश उत्सवानिमित्त जामखेड पंचायत समिती कार्यालयात शनिवारी (दि.२७)  शांतता समितीची बैठक घेण्यात आली. तहसीलदार चंद्रे यांच्या अध्यक्षस्थेखाली झालेल्या बैठकीत  ते बोलत होते. या बैठकीस पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड,
महावितरणचे सहाय्यक अभियंता  हिरामन गावित,संजय काका काशिद, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, मंगेश आजबे, मनसेचे तालुकाध्यक्ष प्रदीप टापरे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे तालुकाध्यक्ष पांडुराजे भोसले, विकी सदाफुले, उत्कर्ष कुलकर्णी, राजेश मोरे, अभिजीत राळेभात, सचिन देशमुख, व्यापारी संजय कटारिया, मोहन पवार ,नगर परिषदेच्या वतीने आकाश डोके, आकाश घागरे,सुनील साळवे ,महेंद्र राळेभात ,गणेश माने
 यांच्यासह  नागरिक उपस्थित होते.
यावेळी बैठकीत अनेक नागरीकांनी सुचना मांडल्या. या  सुचनेनुसार योग्य ती खबरदारी घेऊन गणेश उत्सवात येणाऱ्या नागरिकांची व महिलांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे आश्वासन तहसीलदार  चंद्रे यांनी दिले. 
यावेळी तहसीलदार चंद्रे यांनी महसूल आणि पोलीस प्रशासनातर्फे  उत्कृष्ट गणपती नियोजन करणारांना सन्मान करून त्यांचा सत्कार करणार असल्याचे जाहिर करतानाच,  कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याचा सर्वांनीच प्रयत्न करायचा आहे. गणपती विसर्जन आहे त्याच ठिकाणी होईल . शहरातील वीजेची व्यवस्था, रस्त्यावरील खड्डे बुजविले जातील. याबाबत जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकाऱ्यांना सुचना केली जाईल 
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक  गायकवाड म्हणाले, गणपती मंडळाने रस्त्यावर मंडप टाकू नये .लोकांच्या येण्याजाण्याला अडथळा होईल असे मंडप उभारणी करू नये.  परवानगी नगरपरिषदेची घ्यावी. गणपती मंडळाच्या व्यासपीठावर अथवा दुसऱ्या ठिकाणी सट्टा, जुगार, पत्ते खेळू नये ,दारु पिऊ नये. यामुळे ऐन तारुण्यात तरूण पिढी व्यसनाधीन होत आहे.  धार्मिक परंपरेप्रमाणे  सण साजरे व्हावेत.  गणपती बसवल्या नंतर सकाळच्या आरतीला आणि संध्याकाळच्या आरतीला मंडळाचे कार्यकर्ते गोळा होतात. नंतर कोणीही नसते यासाठी प्रत्येक तासा तासाला  कार्यकर्त्यांना तेथे बसवणे गरजेचे आहे. जेणेकरून सुरक्षेचा प्रश्र राहणार नाही आणि संभाव्य दुर्घटना टळणार आहेत. गणपती समोर ठेवलेला प्रसाद शेळ्या अथवा कुत्रे येऊन खातात. त्यामुळे समई (दिवा) लावलेली असतो , मोठया दुर्घटनेला हेही कारणीभूत ठरू शकते. 
 गणपती मंडळ बसवणाऱ्यां साठी ऑनलाईन नोंदणी  करण्यासाठी पंधरा दिवसापासून  सोशल मीडियावर  गणेश मंडळाला माहिती दिली आहे. परंतु मोजक्याच मंडळांनी ऑनलाइन गणपतीची परवानगी घेतलेली आहे, हे सर्व शासनाने काढलेल्या नियमाप्रमाणे आम्ही करत असतो आम्ही मध्यस्थी म्हणून काम करतो आणि तुमच्या पर्यंत नियमाच्या सर्व माहिती पोहोचवण्याचं काम करत असतो. सी सी टीव्ही हे फार मोठं काम करत असतात.  हे कमी खर्चात खूप मोठे काम करत असते.
यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले,गणेशोत्सवानिमित्त  शहरातील पथदिव्यांची चांगली व्यवस्था करतानाच, सी सी टीव्ही आणि शहरातील संपुर्ण रस्त्यावरील खड्डे नगरपरिषदेच्या वतीने तातडीने बुजवणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here