ग्रामपंचायत सत्ता विकास कामे करणाऱ्यांच्या विचारांची असावी : सभापती दाते. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 21, 2022

ग्रामपंचायत सत्ता विकास कामे करणाऱ्यांच्या विचारांची असावी : सभापती दाते.

 ग्रामपंचायत सत्ता विकास कामे करणाऱ्यांच्या विचारांची असावी : सभापती दाते.


पारनेर - 
पारनेर काळकुप ता. पारनेर येथे जिल्हा वार्षिक योजना २०२१-२२ लेखाशीर्ष ३०५४ अंतर्गत माळकुप, काळकुप ते कदमवस्ती ते जामगाव, पारनेर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (ग्रामा-७१) २० लक्ष रुपये कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेच्या बांधकाम व कृषी समितीचे सभापती माननीय काशिनाथ दाते सर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेनेचे तालुका प्रमुख विकास रोहोकले होते तर  पंचायत समिती सदस्य ताराबाई चौधरी, उपतालुकाप्रमुख तुषार बांगर, उद्योजक पोपटराव चौधरी,गणप्रमुख संतोष गुंजाळ, भाळवणी उपसरपंच संदीप ठुबे, माजी चेअरमन गंगाधर रोहोकले, या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी बोलताना सभापती दाते झाले काळकुप चे ग्रामस्थ लवकर कामे मागायला आले असते तर एक कोटींची विकासकामे झाली असती. परंतु असूद्या या गटाचा शिवसेनेचा जिल्हा परिषद सदस्य झाल्यास संपूर्ण रस्ता करून दिण्याची ग्वाही सभापती दाते यांनी दिली. या गावचा आणि माझा जुना ऋणानुबंध आहे ग्रामपंचायत मध्ये विकास कामे करणाऱ्यांच्या विचाराची सत्ता असावी लागते यापुढे आपण सुज्ञ आहात, झालेल्या चुकांच्या दुरुस्त्या केल्या पाहिजे, आणि आपण कराल याची मला खात्री आहे. वेगळ्या वळणावर तालुका जाऊ देऊ नका, जबाबदारी आपली सर्वांची आहे. तालुकाप्रमुख बंडू शेठ रोहोकलेंना संधी चांगली आहे. त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा असे आव्हान सभापती दाते यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन चांगले केले आमचा मान सन्मान केला सर्वांना धन्यवाद देतो. यावेळी पंचायत समिती सदस्य ताराबाई चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सोसायटी संचालक शिवाजी कदम, जनाबाई अडसूळ, ग्राम. सदस्य किरण अडसुळ, संगीता शिंदे, जयश्री कदम, कमल अडसुळ, प्रवीण कदम, दुर्योधन कदम, सुभाष शिंदे, बाळू शिंदे, विठ्ठल अडसूळ, प्रवीण अडसुळ,पारूबाई कदम, मनीषा शिंदे ,संकेत शिंदे, दादा नगरे, अजय शिंदे, प्रवीण शिंदे, रोहित कदम, मयूर कदम, युवराज कदम, राधाकृष्ण सालके, संतोष कदम, कामाचे ठेकेदार इंजि. नागेश रोहोकले आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंजि.  संदीप ठुबे यांनी केले तर आभार उपसरपंच महेश सालके यांनी मानले.

No comments:

Post a Comment