पारनेर ग्रामीण पतसंस्थेला ३ कोटी ९५ लाख रुपये नफा.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 1, 2022

पारनेर ग्रामीण पतसंस्थेला ३ कोटी ९५ लाख रुपये नफा..

 पारनेर ग्रामीण पतसंस्थेला ३ कोटी ९५ लाख रुपये नफा..


पारनेर -
पारनेर ग्रामीण पतसंस्थेला सन  २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात रुपये ३ कोटी ९५ लाख रुपयांचा नफा झाला आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक चेअरमन तथा जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशिनाथ दाते सर यांनी दिली.
संस्थेच्या ठेवी मार्च २०२२ अखेर १७९ कोटी ८० लाख रुपयांच्या आहेत संस्थेचे खेळते भांडवल २०५ कोटी ८७ लाख आहे असुन वसूल भागभांडवल ५ कोटी १४ लाख व इतर निधी १६ कोटी ८२ लाख आहे संस्थेचे कर्जवाटप १३५ कोटी ४७ लाख असून बँक शिल्लक व गुंतवणूक रुपये ६१ कोटी ९ लाख आहे संस्थेची वार्षिक उलाढाल रुपये १७२२ कोटींची झालेली आहे  चालु आर्थिक वर्षीत संस्थेच्या ठेवी मध्ये २२ कोटी ५१ लाख व कर्जामध्ये ११ कोटी ३ लाख वाढ झालेली आहे असे संस्थेचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब सोबले यांनी सांगितले. संस्थेने १९ वर्षाच्या कालावधीत सभासदांच्या विश्वासावर प्रगती केलेली असून सभासदांना घरबांधणी, व्यवसाय, स्थावर मालमत्ता खरेदीसाठी, वाहन खरेदी तसेच गोरगरीब गरजू घटक सुशिक्षित बेरोजगार, शेतकरी, लघुउद्योग, होतकरू कामगार यांना बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक प्रगती करता यावी यासाठी पतसंस्थेच्या माध्यमातून कर्ज वितरण करून आर्थिक विकास करण्याचा प्रयत्न केला आहे संस्थेने एकोणीस वर्षाच्या कालावधीत पारनेर, टाकळी ढोकेश्वर, जामगाव , कामोठे (नवी मुंबई), खडकवाडी, आळेफाटा, सुपा व शिरूर येथे स्वमालकीच्या प्रशस्त व अद्यावत इमारती आहेत पारनेर, टाकळी ढोकेश्वर ,आळकुटी ,बेलवंडी फाटा ,जामगाव, नारायणगव्हाण, आळेफाटा तालुका जुन्नर, सुपा, कामोठे (नवी मुंबई) अमदनगर, ढवळपुरी, भोसरी ,खडकवाडी, मांडवे खुर्द, पळशी व शिरूर अशा सतरा शाखा कार्यरत आहे संस्थेचे कार्यक्षेत्र अहमदनगर, पुणे, ठाणे व मुंबई जिल्हा आहे संस्थेमार्फत पारनेर, टाकळी ढोकेश्वर, आळकुटी व जामगाव ढवळपुरी व बेलवंडी फाटा येथे सभासदांना लॉकर सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. संस्थेच्या आद्यवत कोअर बँकिंग, मोबाईल बँकिंग, एस एम एस सुविधांमुळे ग्राहकांना सर्व माहिती तात्काळ मिळत आहे तसेच संस्थेच्या सर्व शाखांमध्ये महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अधिकृत वीज बिल भरणा केंद्र, आरटीजीएस व एन.ई.एफ.टी. सुविधा सुरू करण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष थोरात यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment