शहर विकासाच्या कामांना गती देणार- कुमारसिंह वाकळे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 18, 2022

शहर विकासाच्या कामांना गती देणार- कुमारसिंह वाकळे.

 शहर विकासाच्या कामांना गती देणार- कुमारसिंह वाकळे.

मनपा स्थायी समितीच्या सभापतीपदी नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांची बिनविरोध निवड


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः आमदार संग्राम जगताप यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला स्थायीच्या सभापती पदावर काम करण्याची संधी दिली असून सर्व नगरसेवक पदाधिकारी यांना बरोबर घेऊन शहर विकासाच्या कामांना आपण गती देणार असल्याचे मत नवनिर्वाचित स्थायी समितीचे सभापती कुमार सिंह वाकळे यांनी व्यक्त केलं आहे. अहमदनगर महानगरपालिका स्थायी समितीच्या सभापतिपदाची निवडणूक जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांचा एकमेव अर्ज दाखल असल्यामुळे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी त्यांची बिनविरोध निवडीची घोषणा केली.
यावेळी नगरसेवक कुमारसिंह वाकळे म्हणाले की, आमदार संग्राम जगताप यांनी माझ्यावर विश्वास टाकून स्थायी समिती सभापती पदावर काम करण्याची संधी दिली या पदाच्या माध्यमातून शहर विकासाला गती देणार, महाविकास आघाडीच्या वतीने काम करण्याची संधी मला मिळाली आहे महापालिकेच्या आवारात लवकरच सर्वांना बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच सर्व नगरसेवक पदाधिकार्‍यांना बरोबर घेऊन नगर शहराच्या विकासासाठी काम करणार असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी महापौर रोहिणीताई शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले,मा.महापौर बाबासाहेब वाकळे,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते, मनपा विरोधी पक्षनेता संपत बारस्कर,नगरसेवक अविनाश घुले, नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे, मा.विरोधी पक्ष नेता संजय शेंडगे, नगरसेवक गणेश कवडे, नगरसेवक प्रशांत गायकवाड, नगरसेवक श्याम नळकांडे, नगरसेवक सचिन शिंदे, नगरसेवक समद खान, नगरसेविका ज्योती गाडे, नगरसेविका वंदनाताई ताठे,विलास ताठे,नगरसेविका मीनाताई चव्हाण, नगरसेविका रिता भाकरे,भा कुरेशी, अंजली आव्हाड, राजेंद्र तागड, साधना बोरुडे तसेच आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी निवडणूक निर्णय उपजिल्हाधिकारी श्री.पाटील व स्थायी समितीचे सदस्य ऑनलाइन सभेत उपस्थित होते. याप्रसंगी ते बोलत होते.

No comments:

Post a Comment