जामखेड एसटी बसवर अज्ञात हल्लेखोरांची दगडफेक, गुन्हा दाखल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 11, 2022

जामखेड एसटी बसवर अज्ञात हल्लेखोरांची दगडफेक, गुन्हा दाखल

 जामखेड एसटी बसवर अज्ञात हल्लेखोरांची दगडफेक, गुन्हा दाखल

हल्लेखोरांनी एसटी बसच्या काचा फोडल्या.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

जामखेड ः रात्री नऊ ते साडे नऊ वाजण्याच्या सुमारास जामखेड अगाराची नगर-जामखेड, एम.एच 40, ए.क्यु.
6224 क्रमांकाची बस रात्रीच्या सुमारास नगरहुन जामखेड कडे येत असताना हरीणारायण आष्टी हद्दी जवळील गांधनवाडी फाटा या ठिकाणी मोटारसायकल वर आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी या बसवर दगडफेक करून बसच्या काचा फोडल्या व घटनास्थळाहुन पळुन गेले. सुदैवाने यामध्ये कोणी जखमी झाले नाही. हल्ला कोणी व कशामुळे केला याचा तपास पोलीस करीत असुन अज्ञात हल्लेखोरां विरोधात बसचालकाने दिलेल्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून एस टी कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपावर उद्याप तोडगा निघाला नाही. मात्र कारवाई च्या भीतीपोटी या संपाला विरोध करत जामखेड अगारातील काही एस टी कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. यामधील हजर झालेल्या एस टी कर्मचार्‍यांनी प्रवाशी घेऊन येत असलेल्या जामखेड अगाराच्या नगर- जामखेड या बसवर अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केली. त्यामुळे कामावर हजर झालेल्या कर्मचार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जामखेड अगाराच्या एस टी कर्मचार्‍यांचा संपाचा 69 वा दिवस आहे. अगारातुन सध्या आठ फेर्‍या सुरू आहेत. अनेक एस टी कर्मचारी कामावर येण्यास इच्छुक आहेत मात्र असे हल्ले होत असल्याने इच्छुक एस टी कर्मचारी कामावर येण्यास घाबरत आहेत. त्यातच बसवर दगडफेक झाल्याने आज सकाळ पासून फक्त एकच एस टी बस अगाराबाहेर पडली. हल्लेखोरांचा बंदोबस्त करुन एस टी ला पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी हजर झालेल्या एस टी कर्मचार्‍यांकडुन होत आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी सव्वा दोन महिने उलटले तरी अद्याप पर्यंत संपावर तोडगा निघालेला नाही. मात्र कारवाईच्या भीतीपोटी काही एस टी कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. जामखेड अगाराच्या एस टी कर्मचार्‍यांचा आजचा 69 वा दिवस आहे. जामखेड च्या एस टी बस स्थानकावरून प्रवाशांसाठी सध्या आठ फेर्या सुरू आहेत.

No comments:

Post a Comment