कोरोना निर्बंध असले तरी., शहरात पतंग उत्सवाची धूम. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 11, 2022

कोरोना निर्बंध असले तरी., शहरात पतंग उत्सवाची धूम.

 कोरोना निर्बंध असले तरी., शहरात पतंग उत्सवाची धूम.

पतंग, मांजा खरेदीसाठी प्रचंड उत्साह.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः 14 जानेवारीचा मकर संक्रांतीचा सण जवळ आल्याने मांजा, पतंग खरेदी करण्यासाठी विद्यार्थी, युवक, नागरिक पतंग, मांजा विक्रीच्या दुकानांकडे वळू लागले आहेत. कोरोना संक्रमणामुळे सध्या शाळेला सुट्टी असल्यामुळे या वर्षी कोरोनाचे निर्बंध असले तरी पतंग उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होण्याचे संकेत मिळत आहेत.
मकरसंक्रांतीचा सण अगदी तीन दिवस जवळ आल्याने शहरात ठिकठिकाणी पतंग व नायलॉन मांजाची विक्री सुरु होताना दिसून येत आहे. याच पंतगाबरोबर विकला जाणारा मांजा मात्र नागरिकांच्या जीवाला धोकादायक ठरत आहे. पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणार्‍या नायलॉनच्या मांज्यामुळे शहरात अपघात घडण्याची शक्यता आहे. मागील काही वर्षात शहरात चायना व नायलॉन मांजा विक्रीसाठी बंदी असताना सर्रासपणे चायना मांजा ची विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. पतंग उडवताना वापरला जाणारा मांज्या अनेकदा तुटून झाडे, इमारती, उड्डाण पूल अश्या ठिकाणी अडकून पडतो.त्यामुळे अनेक पक्ष्यांनाही दुखापत होऊन जीव गमवावा लागतो. मांज्यामुळे गळा कापला जाउ शकतो.
नायलॉन मांजा हा जीवघेणा आहे. यामुळे माणसांचे गळे कापले जातात. कुणी मरतो तर कुणाला जखम होते. पक्ष्यांनाही याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. म्हणून कायद्यानं यावर बंदी घातली आहे. तरीही ऑनलाईन विक्री केली जाते. त्यामुळं या नायलॉन मांजाची ऑनलाईन विक्री कशी थांबविणार असा प्रश्न सायबर पोलिसांना पडला आहे.
काही दिवसात पतंग बाजीमध्ये विकृतता आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेक लोक प्रतिबंधित नायलॉन मांजाने पतंग उडवितात. नायलॉन मांजा पर्यावरणासाठी देखील हानीकारक आहे. मानवासाहित पशु पक्ष्यासाठी देखील धोकादायक आहे. त्यामुळं उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नायलॉन मांजा विक्री करणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. पोलिसांकडून या संदर्भात रोज कारवाई केली जात आहे. ऑनलाइन देखील नायलॉन मांजाची डिलीव्हरी होत असून शॉप क्लुज नावाच्या वेबसाईटवरून ऑनलाइन मांजा मागविला जात आहे. नायलॉन मांजाने पतंग उडविताना अनेक वेळा मांजा रस्त्यावरून जात असल्याने निष्पाप नागरिक जखमी झाले. सोबतच पशु-पक्षी देखील नायलॉन मांजामुळं मृत झाल्याचं निदर्शनास आलं आहे. नायलॉन मांजा नष्ट होत नसल्यानं पर्यवरणासाठी देखील हानिकारक आहे. त्यामुळं पोलीस कारवाई करतील. मात्र आता नागरिकांनी आपली हौस भागविण्यासाठी निष्पाप लोकांच्या जीवावर उठण कितपत योग्य आहे याचा देखील विचार करणं आवश्यक झालं आहे.
तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या मकरसंक्रांतीला शहरात पतंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. शाळांना सुट्ट्या जाहीर झाल्या असताना पतंग आणि मांजाचा बाजार तेजीत आला आहे. शहरातील झेंडीगेट व बागडपट्टी भागात ठोक आणि किरकोळ विक्रेत्यांची दुकाने थाटली गेली आहे. विविध रंग, आकारात कागदी व प्लॅस्टिकचे आकर्षक पतंग युवकांचे लक्ष वेधून घेत आहे. नायलॉन मांजावर प्रतिबंध आल्याने विक्रेत्यांनाही बरेली व पांडा मांजाला प्राधान्य दिले आहे. तयार मांजाची चक्री दीडशे ते हजार रुपयापर्यंत विक्री होत आहे. पतंग देखील पाच ते तीस रुपया पर्यंत उपलब्ध आहे. मकरसंक्रांतीला बालकांपासून वयस्कांपर्यंत प्रत्येक जण संक्रांतीला पतंग उडविण्याचा आनंद घेत असतात. शहरात पतंगाची मोठी बाजारपेठ असल्यामुळे तालुकास्तरावरील नागरिकही पतंग, माजा खरेदीसाठी शहरात येण्यास पसंती देत असल्याची माहिती शहरातील जुने पतंग व्यावसायिक रोहिदास चिपोळे यांनी दिली.

No comments:

Post a Comment