चांदणी चौकात पोलिसाला मारहाण. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 11, 2022

चांदणी चौकात पोलिसाला मारहाण.

 चांदणी चौकात पोलिसाला मारहाण.

7 जणांवर गुन्हा दाखल.मोबाईल व 20 हजार रुपये काढून घेतले.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर मुख्यालयात नेमणूक असणारे पोलीस कर्मचारी आदिनाथ दिनकर शिरसाठ रा.आष्टी जि.बीड यांना चांदणी चौकातील महालक्ष्मी मंदिराच्या समोर धडक लागल्याच्या कारणावरून मारहाण करीत 20 हजार रुपये व 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल काढून घेतल्याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून श्याम बाबासाहेब जाधव, रोहन राजु जाधव (दोघे रा. निंबोडी ता. नगर) व अनोळखी सहा जणांविरूध्द दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.
पोलिस कर्मचारी शिरसाठ हे त्यांच्या दुचाकीवर चांदणी चौकातून जात असताना महालक्ष्मी मंदिराच्या समोर दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणातून त्यांचा व जाधव यांचा वाद झाला. या वादात आठ जणांनी पोलिस कर्मचारी शिरसाठ यांना मारहाण केली. त्यांच्याकडील 20 हजार रूपये व मोबाईल काढून घेतला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

No comments:

Post a Comment