रयत शिक्षण संस्थेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त अभिवादन. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, January 31, 2022

रयत शिक्षण संस्थेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त अभिवादन.

 रयत शिक्षण संस्थेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त अभिवादन.

हुतात्मा दिन-  राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त अभिवादन व सी. आरपीएफ चे जवान श्री. गणेश भोसले यांचा श्री. नागेश विद्यालयाच्या वतीने सन्मान... 


जामखेड -
रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश संकुलामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधीजी पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करून श्रद्धांजली वाहण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक रमेश बोलभट प्रमुख पाहुणे कन्या विद्यालय स्कूल कमिटी अध्यक्ष माननीय श्री मधुकर (आबा) राळेभात , प्राचार्य श्री मडके बी के मुख्याध्यापिका सौ चौधरी के डी, नागेश विद्यालयाचे माजी विद्यार्थी व सीआरपीएफचे जवान श्री गणेश भोसले, उपमुख्याध्यापक तांबे पी एन ,पर्यवेक्षक साळवे डी एन व प्रकाश सोनवणे तसेच नागेश व कन्या विद्यालयातील सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. 
    यावेळी कवडे सर, श्रीमती मस्के मॅडम,श्री शेटे सर  यांनी महात्मा गांधीजींच्या कार्याची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले.
कन्या विद्यालय येथील मुलींनी देशभक्तीपर गीताद्वारे नृत्य सादरीकरण करून संदेश दिला.
     कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री मधुकर (आबा) राळेभात यांनी महात्मा गांधीजींचे  विचार आचार चरित्र यांची माहिती दिली 
  या   थोर राष्ट्रीय नेत्याला आदरांजली देण्यासाठी ३० जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून देशभर पाळला जातो. सत्य, अहिंसा आणि शांतीचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधींचे विचार इतके प्रभावी आहेत की त्यांनी संपूर्ण जगाला आपल्या विचारांनी भुरळ पाडली आहे. आपल्या अहिंसात्मक आंदोलनाच्या माध्यमातून या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केले. 
      असे मनोगत व्यक्त केले. 
      नागेश विद्यालयाचे माजी विद्यार्थी व सीआरपीएफ मध्ये कार्यरत जवान श्री गणेश भोसले यांचा सत्कार कन्या विद्यालय स्कूल केमीटी अध्यक्ष मधुकर राळेभात यांचे हस्ते सन्मान  करण्यात आला. 
         शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक रमेश बोलभट यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांचे जीवन पट विद्यार्थ्यांसमोर सांगून महापुरुषांचा आदर्श आपण घेतला पाहिजे असे मनोगत व्यक्त केले.

  स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ ३० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता  मौन पाळून आदरांजली  वाहण्यात आली.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष सरसमकर यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका सौ चौधरी के डी यांनी केले.

No comments:

Post a Comment