आयुक्तांच्या दालनात जागृक मंचची गढूळ पाणी व चिखलाची पूजा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 13, 2021

आयुक्तांच्या दालनात जागृक मंचची गढूळ पाणी व चिखलाची पूजा.

आयुक्तांच्या दालनात जागृक मंचची गढूळ पाणी व चिखलाची पूजा.

2 वर्षांपासून नगरकरांना दूषित पाणीपुरवठा.

सत्ताधार्‍यांचे डोळ्यांवर हात.. राज्यमंत्री असून नसल्यासारखे.. पालकमंत्र्यांचे दर्शन दुर्लभ.
नगरशहर खड्डे व चिखलमय झालंय.

शहरामध्ये महानगरपालिकेचा चालू असलेल्या अंदाधुंद कारभारामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. महापालिकेने फेज 2 योजनेंतर्गत आगरकर मळा, स्टेशन रोड, कायनेटिक चौक परिसरात अनेक दिवसापासून अतिशय दूषित व गढूळ पाणीपुरवठा होत आहे. लाखो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ही बाब वारंवार मनपा आयुक्त शंकर गोरे व अभियंतांच्या निर्देशास आणून देखील अद्याप स्वच्छ पाणीपुरवठा होत नसल्याच्या निषेधार्थ जागरूक नागरिक मंचचे अध्यक्ष सुहास मुळे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका आयुक्तांच्या दालना बाहेर गढूळ पाण्याची पूजा मांडून अनोखे आंदोलन केले. तृतीयपंथी नागरिकांच्या हस्ते पूजा करून चिखलाचा नैवेद्य दाखवून आरती केली. दगडांचा प्रसाद वाटला. यावेळी नागरिकांना सुविधा देण्यास असमर्थ असलेल्या मनापा अधिकार्‍यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. मनापा उपायुक्त प्रदीप पठारे यांनी आंदोलकांच्या भावना समजावून घेत उपाय योजना राबवण्याचे आश्वासन डेली. मात्र समाधान न झाल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले. याच वेळी महापालिकेत आलेले आयुक्त शंकर गोरे यांनी मात्र कार्यालयात न येता बाहेरच्या बाहेर जाणे पसंत केल्याने आंदोलक अधिक चिडले.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर मधील डांबरट ठेकेदारांनी पुढार्‍यांच्या संगनमताने केलेल्या बिन डांबराच्या डांबरी रस्त्याचा, भुयारी गटार योजना, फेज 2 पाणी योजना याचा पुरता बोजवारा उडालेला आहे. संपूर्ण नगर शहर  खड्डे व चिखलमय झालेलं असून नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत झालेला आहे. यातच भर म्हणून आज दोन महिने झाले संपूर्ण शहराला दूषित पाणीपुरवठा होत आहे. महापालिकेचा अनागोंदी कारभार वाढतच चालला आहे. स्थानिक सत्ताधार्‍यांनी डोळ्यावर हात ठेवले असल्याने त्यांच्या विषयी तर बोलावंसं देखील वाटत नाही. जिल्ह्यामध्ये नगर विकास राज्यमंत्री असून नसल्यासारखे आहेत, पालक मंत्र्यांचे दर्शन दुर्लभ आहे. कोरोना ने आधीच पिचलेल्या जनतेला, प्रामाणिकपणे कर भरणार्‍या जनतेला साधे पिण्याचे पाणी, पाय ठेवायला रस्ता देखील जर ही मनपा देऊ शकत नसेल तर ही महानगरपालिका नसून टक्के वारी महानरक पालिका आहे. अशा या अनाथ महानरकपालिकेला बरखास्त करा, अशी मागणी जागरूक नागरिक मंचचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांनी केली आहे.
मुळे पुढे म्हणाले,  एवढ्या मोठ्या महानगरपालिकेमध्ये फक्त 9 अभियंते आहेत. महापालिकेच्या आजपर्यंतच्या मनपा खर्चाच्या बाबतीत प्रशासकीय खर्च प्रचंड अनागोंदी असल्यामुळे नवीन पदे भरायला गेल्या वीस वर्षांपासून परवानगी मिळत नाही. औरंगाबाद सारख्या ठिकाणी 60 अभियंते आहेत. सोलापूर सारख्या ठिकाणी 110 अभियंते आहेत. मात्र आपले पुढारी व मनपाचे प्रशासन यासाठी काडीमात्र प्रयत्न करत नाहीत, कारण टक्केवारी घेण्याच्या पलीकडे कोणाचा काहीच अभ्यास नाहीये. उपलब्ध असलेल्या अतिशय तुटपुंज्या कर्मचार्‍यांच्या मदतीनेच या शहराच्या गोधडीला ठिगळं लावण्याचा अयशस्वी प्रयत्न ते करतात. अशी टीका  मनपा कारभारावर केली. यावेळी  जागरूक नागरिक मंचाचे सचिव कैलास दळवी, योगेश गंणगले, अभय गुंदेचा, संजय झिंजे,  जय मुनोत, प्रसाद कुकडे, राजू लाळगे, मामा जाधव, करुणा कुकडे, श्यामा साठे,  आशा गायकवाड, मयुरी मुळे, यांच बरोबरच तृतीयपंथीय अम्मा, संगीता,अलका ,सुंदरा व जागरूक नागरिक मंचच्या सदस्यांनी आयुक्त यांचे दालन दणाणून सोडले.

No comments:

Post a Comment