सोमवार ते बुधवार शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, December 18, 2021

सोमवार ते बुधवार शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत.

 सोमवार ते बुधवार शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत.

अमृत पाणीपुरवठा फेस 2 कामासाठी सोमवारी शटडाऊन.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वपूर्ण असणार्‍या अमृत पाणीपुरवठा योजना फेस 2 चे काम आता अंतिम टप्प्यात असून या कामासाठी सोमवार 20 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते सायंकाळी सहा या काळात शटडाऊन घेण्यात येणार असून त्यामुळे या काळात मुळानगर, विळद येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार असल्याने शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता येणार नाहीत. त्यामुळे बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सुर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर तसेच केडगाव, नगर-कल्याण, रोडवरील शिवाजीनगर परिसर इ. भागास पाणी वाटपाच्या भागास पाणीपुरवठा होउ शकणार नाही. हा पाणीपुरवठा हा दि.21 ला मंगळवारी येणार आहे. तसेच मंगळवार दि.21-12-2021 रोजी रोटेशननुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच मंगलगेट, रामचंद्र खुंट,कोठला, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, म्युनिसीपल हाडको, सावेडी, सारसनगर व बुरुडगांव रोड या भागात पाणीपुरवठा होणार नसून तो बुधवार दि.22-12-2021 रोजी करण्यात येईल. व बुधवार दि.22-12-2021 रोजी रोटेशननुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच सर्जेपुरा, तोफखाना, सिध्दार्थनगर, लालटाकी, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, ख्रिस्तगल्ली, माळीवाडा, माणिकचौक, आनंदीबाजार, जुने मनपा कार्यालय परिसर, पंचपीर चावडी, बालिकाश्रम रोड परिसर, स्टेशनरोड, विनायकनगर, आगरकर मळा व सावेडी इत्यादी भागातील पाणीपुरवठा हा बुधवार ऐवजी गुरुवार दि.23-12-2021 रोजी करण्यात येणार आहे.
शहरातील पाणीपुरवठा एक दिवस बंद करून उपनगरात ज्या भागात जास्त दिवसाचे रोटेशन आलेले अशा भागात पाणीपुरवठा करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे. तरी नागरीकांनी याची नोंद घेवून असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे मनपाने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment