स्वच्छता अभियानाचे नागरिकांकडून कौतुक- उपमहापौर. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 30, 2021

स्वच्छता अभियानाचे नागरिकांकडून कौतुक- उपमहापौर.

 स्वच्छता अभियानाचे नागरिकांकडून कौतुक- उपमहापौर.नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने महिन्यातून एकदा नगर शहर स्वच्छ अभियान राबविण्यात येत आहे. स्वच्छ सुंदर व हरित नगर ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. ज्या ज्या ठिकाणी आम्ही अभियान राबवतो त्या ठिकाणचे नागरिक अभियानाचे कौतुक करत आहे. या अभियानामध्ये नगरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले कर्तव्य पार पाडावे. असे आवाहन उपमहापौर गणेश भोसले यांनी केले आहे.
आज नेप्ती नाका येथील अमरधाममध्ये उपमहापौर गणेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या ठिकाणी संपूर्ण अमरधाम पाण्याच्या सहाय्याने धुवून काढण्यात आले. ठिक ठिकाणी  साचलेली कचर्‍याचे ढीग उचलण्यात आले.
याप्रसंगी उपमहापौर म्हणाले की, अमरधाम येथे राबवण्यात आलेल्या शहर स्वच्छ अभियान हे कर्मचार्‍यांच्या माध्यमातून यशस्वीपणे राबविले आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार 30-35 वर्षानंतर पहिल्यांदा अमरधाम ची एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वच्छता करण्यात आली.याच बरोबर संपूर्ण अमरधाम पाण्याच्या प्रेशर च्या साहाय्याने धून काढण्यात आली आहे. पुढील काही दिवसांमध्ये अमरधाम च्या काही जागेवर वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करण्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
यावेळी स्मार्ट एलईडी पथदिवे ही बसविण्यात आले. सफाई कर्मचार्यांच्या वतीने संपूर्ण अमरधाम ची झाडलोट करण्यात आली त्यामुळे या परिसराला एक नवे रूप मिळाली आहे. हे अभियान दर महिन्याच्या 30 तारखेला नगर शहरामध्ये ठीक ठिकाणी राबवण्यात येत आहे. या अभियानामध्ये महापालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून यशस्वी काम करत आहेत. यावेळी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment