एकतर्फी प्रेमातील विकृतपणा! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, October 13, 2021

एकतर्फी प्रेमातील विकृतपणा!

 एकतर्फी प्रेमातील विकृतपणा!


रा
ज्यातील महिला, युवती राज्यात किती असुरक्षित आहेत याचं भिषण वास्तव्य म्हणजे काल पुण्यातील 8वी तील कबड्डीपटू मुलीची कोयत्याने हत्या झालेलं प्रकरण. राज्यात पोलिस खातं, कायदा आहे याचा विसर पडू लागला की काय असा प्रश्न या हत्येमुळे उपस्थित झाला आहे. कुठे गेल्या महिलांच्या सामाजिक संघटना? कुठे आहेत सुप्रिया सुळे? निर्मलाताई गोरे? विद्याताई चव्हाण? एक आठवीतील मुलगी प्रेमाला नकार देते म्हटल्यावर कोयत्याने तिचं धड क्षणात वेगळं करायला हात थरथरत नाहीत. कुठे नेऊन ठेवलंय महाराष्ट्राला?
हत्या झालेली मुलगी इयत्ता आठवीत शिकत होती. आरोपीसोबत अन्य दोन व्यक्ती होत्या. मुलगी बिबवेवाडी परिसरात कबड्डीचा सराव करत होती. यावेळी मुख्य आऱोपी आणि इतर दोघे तिच्याजवळ आले. यातील एकाने तिच्यावर कोयत्याने अचानकपणे वार करायला सुरुवात केली. आरोपी हा अत्यंत त्वेषाने अल्पवयीन मुलीकडे गेला होता. मुलगी कबड्डी खेळण्यात मग्न होती. त्यावेळी आरोपींनी मुलीवर कोयत्याने सपासप वार केले. थेट मानेवर वार झाल्यामुळे काही समजायच्या आत मुलगी जमिनीवर कोसळली. त्यानंतर आरोपीने फक्त मानेवरच आणखी वार केले. आरोपीने अत्यंत अमानुषपणे मुलीचा खून केला. तसेच या मुलीचे डोके धडापासून वेगळे करण्याचा मानस या आरोपींचा होता की काय ? अशी शंका अपस्थित केली जात आहे. ज्या व्यक्तीने मुलीचा खून केला त्याच्याकडे कोयता तसेच पिस्तुलदेखील होते. मात्र, खून करताना रागाच्या भरात त्याने कोयत्याचा उपयोग केला. तर खून केल्यानंतर पिस्तूल घटनास्थळीच फेकून देत पळ काढला. दरम्यान, या अत्यंत भीषण खुनामुळे बिबवेवाडी तसेच पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
संपूर्ण पुणे या घटनेने हादरुन गेले. मुलगी दररोज आपल्या वेळेप्रमाणे कबड्डी खेळण्याच्या सरावाला जात असताना तिच्यावर तीन जाणांनी कोयत्याने सपासप वार करुन तिची निर्घूण हत्या केली. या तीन जणांपैकी दोन जण त्वरित पोलिसांच्या हाती लागले. यातील एक फरारी आरोपी देखील पोलिसांच्या हाती लागला असून पोलिसांनी 12 तासांच्या आत तिघांचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे. ही धक्कादायक घटना प्रेमप्रकरणातून घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
आरोपी दोन दिवस आधीपासून घटनास्थळी मुलीवर पाळत ठेवून होता. तर 5 वर्षांपासून पीडितेच्या संपर्कात होता. आतापर्यंत मुख्य आरोपीसह चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे. एकतर्फी प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पीडित अल्पवयीन मुलगी कबड्डीच्या सरावासाठी काल (मंगळवारी) यश लॉन्स परिसरात आली होती. त्याचवेळी आरोपीने तिच्यावर हल्ला केला. दोन दिवस आधी आरोपीने स्पॉटवर मुलीवर पाळत ठेवली होती.
एका अल्पवयीन मुलीवर अशाप्रकारे वार करण्याची ही घटना अत्यंत निंदनीय आणि माणूसकीला काळीमा फासणारी आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहारात एका मुलीची मैदानी खेळात अशाप्रकारे निर्घृण हत्या व्हावी हे सामाजिक अध:पतनाचे गंभीर लक्षण आहे. 14 वर्षांची ही मुलगी तिथल्या स्थानिक कबड्डीसंघात खेळत होती. बिबडेवाडी येथे नियमित सरावाला गेली असती तिथे तिच्यावर तीन जणांनी कोयत्याने वार केले. त्यात मुलीचा मृत्यू झाला. यातील मुख्य आरोपी ऋषीकेश भागवत हा मुलीचा चुलत मावस भाऊ असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दोन आरोपींना तात्काळ अटक केली आणि एका आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढून बिबवेवाडीतील यश लॉन्स परिसरात लपून बसला होता. मात्र तिसर्‍या आरोपीला देखील 12 तासांच्या आत पोलिसांनी अटक केली आहे.
या घटनेवर आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.अतिशय भयानक काय चाललयं पुण्यात कोयत्याने वार करून खून  करतांनाही अंगावर काटा येतोय काय भोगलं असेल ?तीने कायदा सुव्यवस्था वार्यावर पोलिस कायदे कागदावर अशी सध्या परिस्थिती आहे महाराष्ट्रातल्या आपल्या या सावित्रीच्या लेकी रोज बळी पडताहेत यांच्यासाठी सरकार कधी करतयं महाराष्ट्रबंद अशा शब्दात ठाकरे सरकारवर चित्रा वाघ यांनी नाराजी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment