पवार, गडकरींच्या उपस्थितीत विविध रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, September 30, 2021

पवार, गडकरींच्या उपस्थितीत विविध रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन.

 पवार, गडकरींच्या उपस्थितीत विविध रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन.

शनिवारी राष्ट्रवादी-शिवसेना-काँग्रेस-भाजपा नेते एका मंचावर...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः देशाच्या राजकारणात राज्यातील दोन मान्यवरांचा सतत दबाव राहिला आहे हे दोन नेते म्हणजे राष्ट्रवादीचे शरद पवार व भाजपाचे नितीन गडकरी. पुण्यातील कार्यक्रमात गडकरींनी अजित पवारांना सोबत घेतलं. आता अहमदनगर मधील विकासात्मक कामांच्या भूमिपूजनासाठी गडकरी शरद पवारांना सोबत घेत आहेत.काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी शनिवारी रस्ता कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यासाठी नगरला येत आहेत. केडगाव जवळील सोनेवाडी रस्त्यावर होणार्‍या कार्यक्रमात एकत्र असतील. गडकरी यांच्या पुढाकाराने सुमारे 4 हजार कोटी रुपयांची रस्त्याची कामे होत आहेत अशी माहिती भाजपचे नगर शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी दिली.
नगर- करमाळा-टेंभुर्णी या चारपदरी रस्त्याचे 80 किलोमीटर काम होत असून त्यासाठी 2 हजार 12 कोटी रुपये खर्च होत आहेत. सावळी विहीर ते अहमदनगर बायपास या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी 496 कोटी रुपये खर्च होत असून हा 80 किलोमीटरचा रस्ता आहे. अहमदनगर आणि भिंगार असा 18 किलोमीटरचा रस्ता रुंदीकरण होत असून त्यासाठी 35 कोटी रुपये तर राष्ट्रीय राखीव निधीमधील कामांसाटी 84 कोटी रुपये खर्च होत आहे. या कामाचे भूमिपूजन होत आहे. अहमदनगर - दौंड- वासुंदे फाटा रस्ता मजबुतीकरण, अहमदनगर - कडा - आष्टी - जामखेड रस्ता मजबुतीकरण, नांदुर शिंगोटे- ते कोल्हार रस्ता मजुबतीकरण व कोपरगाव - वैजापूर रस्ता मजबुतीकरण कामे पूर्ण झाली आहे. या कामाचा लोकार्पण सोहळा होत आहे. एकूण 4 हजार 74 कोटी रुपयांची ही कामे आहे. केडगाव जवळील सोनेवाडी रस्त्यावरील श्रेया गार्डन येथे मुख्य व एकत्रित हा कार्यक्रम होत आहे.
नगर जिल्ह्यात शरद पवार व नितीन गडकरी या दोन मातब्बर नेत्यांसह शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते पहिल्यांदाच एका मंचावर येत आहेत. नितीन गडकरी यांचे शुभहस्ते शनिवारी रस्ता कामाचे भूमिपूजन व लोकार्पन होत असून माजी केंद्रीय कृषिमंत्री  व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पालकमंत्री हसन मुश्रीफ, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे व सदाशीव लोखंडे, महापौर रोहिनी शेंडगे यांच्यासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी सुनील रामदासी, सचिन पारखी, विवेक नाईक, तुषार पोटे, संतोष गांधी, नरेंद्र कुलकर्णी, विवेक नाईक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment