पैसे न दिल्याने तृतीयपंथीयांकडून नागरिकाची हत्या. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, September 17, 2021

पैसे न दिल्याने तृतीयपंथीयांकडून नागरिकाची हत्या.

 पैसे न दिल्याने तृतीयपंथीयांकडून नागरिकाची हत्या.

आठ तृतीयपंथीय गजाआड; एक फरार गुन्हा दाखल.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः दिलीप आभाळे रा.राहता व त्यांचे मित्र नंदू शिरसागर गणेश नगर येथे पेट्रोल भरण्यासाठी जात असताना चार तृतीयपंथीयांनी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली असता. तृतीयपंथीय व त्यांचे मध्ये वाद झाला पैसे न दिल्याचा राग आल्याने तृतीयपंथीयांनी त्यांना त्यांच्या एकरूखे गावात जाऊन लाकडी दांडक्यांनी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीमुळे औषध उपचारादरम्यान दिलीप आभाळे यांचा मृत्यू झाला असून दाभाडे यांचा मुलगा महेश आभाळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चारही तृतीयपंथीयांवर गुन्हा दाखल करून 8 तृतीयपंथीयांना श्रीरामपूरमधून अटक करण्यात आली असून, 1 तृतीयपंथीय आरोपी फरार झाला आहे.
सदर घटनेची हकीकत अशी की, सकाळचे वेळी फिर्यादी महेश दिलीप आभाळे (वय 23 वर्षे धंदा खाजगी नोकरी आभाळे वस्ती एकरूखे ता राहता) यांचे वडील दिलीप आभाळे हे व त्यांचे मित्र निवृत्ती उर्फ नंदू चांगदेव शिरसागर असे दोघे गणेश नगर येथे पेट्रोल भरण्यासाठी जात असताना गणेश नगर फाटा येथे काही तृतीयपंथीयांनी फिर्यादी यांचे वडिलांना अडवून पैशाची मागणी केली होती. त्यावरून तृतीयपंथी व फिर्यादीचे वडील यांच्यात वाद झाले होते त्याचा राग मनात धरून तृतीयपंथीयांनी त्याच दिवशी त्यांचे इतर साथीदारांसह एकरूखे गावांमध्ये जाऊन फिर्यादीचे वडील दिलीप आभाळे व निवृत्ती ऊर्फ नंदू चांगदेव शिरसागर यांना लाकडी दांड्याने व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली होती त्यानंतर फिर्यादी यांचे वडीलांवर औषध उपचार चालू असताना त्यांच्या मृत्यू झाला. या घटनेबाबत फिर्यादी यांनी राहता पो.स्टे येथे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सचिन उत्तम जाधव उर्फ संचिता तमन्ना पवार रा.श्रीरामपूर व त्यांचे नऊ सातीदराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस अधिक्षक अहमदनगर, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, उपविभागीय पोलिस अधिकारी शिर्डी विभाग, अनील कटके स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर गुन्हा घडले ठिकाणी एकरूखे ता राहता येथे भेट देऊन घटनेची व आरोपींची माहिती घेतली त्यानंतर पोलीस अधीक्षक यांचे आदेशाने गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणे कामी अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक नेमून आरोपींचा शोध घेणे बाबत सूचना दिल्या.त्या प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे सोपान गोरे, मन्सूर सय्यद, भाऊसाहेब काळे, विजयकुमार वेठेकर, मनोहर गोसावी, शंकर चौधरी, दिलीप शिंदे, रवी सोनटक्के, संतोष लोंढे, विनोद मासाळकर, रोहिदास नवगिरे, मयूर गायकवाड, संभाजी कोतकर यांनी मिळून गुन्ह्यातील आरोपींचे ठावठिकाणा बाबत गोपनीय माहिती घेऊन व मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीतांचा शोध घेऊन प्रथम आरोपी सचिन उत्तम जाधव उर्फ संचिता तमन्ना पवार वय 26 वर्षे सुभाष कॉलनी श्रीरामपूर यास ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेऊन गुन्हातील इतर साथीदार आरोपी बाबत कसून चौकशी केली असता त्याने दिलेल्या माहितीचे व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे उर्वरित आरोपी त्यांचा शोध घेऊन आरोपी नावे विकास दशरथ धनवडे उर्फ रूपाली सलोनी शेख (वय 25 वर्ष सदर), आनंद फौजी शेलार उर्फ रूचिरा सलोनी शेख (वय 20 वर्ष सदर),लक्ष्मण शंकर वायकर उर्फ लक्ष्मी सलोनी शेख (वय 20 वर्ष रा.इंदिरा नगर कोपरगाव) अभिजीत उर्फ गोट्या बाळू पवार (वय 23 वर्षे रा.खंडाळा ता श्रीरामपुर), गौरव उर्फ सनी भागवत पवार (वय 19 वर्षे रा.खंडाळा ता श्रीरामपूर), राहुल उत्तम सोनकांबळे (वय 22 वर्षे राखंडाळा ता श्रीरामपूर) सत्तार शेख वय 19 वर्षे रा.खंडाळा ता श्रीरामपूर) या सर्वांना खंडाळा, श्रीरामपूर, नायगाव, कोल्हार अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले.
आरोपींचा आणखी एक साथीदार इरफान रज्जाक शेख (रा.खंडाळा ता श्रीरामपूर) याचा शोध घेतला, परंतु तो मिळून आला नाही.
ताब्यात घेतलेले आरोपींकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी हा गुन्हा केला असल्याची माहिती दिल्याने आरोपींना राहाता पो.स्टे येथे हजर करण्यात आले आहे. पुढील कार्यवाही राहता पो.स्टे करीत आहे.
ही कारवाई मनोज पाटील पोलीस अधिक्षक अहमदनगर, दिपाली काळे मॅडम अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, व संजय सातव साहेब उपविभागीय पोलिस अधिकारी शिर्डी विभाग यांची सूचना मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

No comments:

Post a Comment