शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदी आ.आशुतोष काळे, उपाध्यक्षपदी जगदीश सावंत. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, September 17, 2021

शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदी आ.आशुतोष काळे, उपाध्यक्षपदी जगदीश सावंत.

 शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदी आ.आशुतोष काळे, उपाध्यक्षपदी जगदीश सावंत.

नगर जिल्ह्याला झुकतं माप.. कोपरगावमध्ये जल्लोष..


शिर्डी :
शिर्डी साईबाबा संस्थानाच्या विश्वस्त मंडळ जाहीर करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांची साईबाबा संस्थानाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहेतर जगदीश सावंत यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आलीय. 12 जणांचे विश्वस्त मंडळाचे गॅझेट काढून जाहीर केलं आहे. यात अहमदनगर जिल्ह्याला झुकते माप देण्यात आल्याचे दिसून येतंय.
आज महाराष्ट्र सरकारने अधिकृत नावांची घोषणा केली असून या यादीत अहमदनगर जिल्ह्याला झुकते माप देण्यात आल्याचे दिसून येतंय. कोपरगाव तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आशुतोष काळे यांच्यासह अहमदनगर जिल्ह्यातील 9 जणांना विश्वस्त मंडळात संधी देण्यात आलीय तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या जवळचे सहकारी राहुल कणाल यांनासुद्धा विश्वस्त पदाची लॉटरी लागलीय. दरम्या, आमदार आशुतोष काळे यांची शिर्डी संस्थानाच्या अध्यपदी निवड झाल्यानंतर कोपरगावमध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष सुरु आहे. आशुतोष काळे यांच्या समर्थकांकडून मतदारसंघात फटाके फोडून आनंद साजरा करण्यात येत आहे.
12 जणांचे विश्वस्त मंडळ - आमदार आशुतोष काळे (अध्यक्ष), जगदीश परीश्चंद्र सावंत (उपाध्यक्ष), अनुराधा गोविंदराव आदीक, सुहास जनार्दन आहेर, अविनाश अप्पासाहेब दंडवते, सचिन रंगराव गुजर, राहुल नारायण कणाल, सुरेश गोरक्षनाथ वाबळे, जयंतराव पुंडलिकराव जाधव, महेंद्र गणपतराव शेळके, एकनाथ भागचंद गोंदकर, अध्यक्ष शिर्डी नगर पंचायत.

No comments:

Post a Comment