वीर योध्दा’ ठरणार ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नवसंजीवनी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, September 16, 2021

वीर योध्दा’ ठरणार ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नवसंजीवनी

 वीर योध्दा’ ठरणार ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नवसंजीवनी'

माजी सैनिक श्री. आबाजी झगडे यांचे प्रतिपादन

शासकीय नोकर्यांमध्ये करिअर करण्यासाठी उत्सुक असणार्या मुलांसाठी ’वीर योध्दा’ करिअर अ‍ॅकॅडमी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नवसंजीवनी ठरेल यात शंका नाही. आम्ही आणि आमचे सहकारी योग्य प्रकारे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधीसाठी योग्य मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना 100% रिझल्ट देऊ   - श्री. आशिष पोटे- संस्थापक अध्यक्ष वीर योद्धा करिअर अकॅडमी

नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले असताना ग्रामीण भागातील विद्यार्थी पोलिस भरती, आर्मी भरती, नौदल भरती किंवा इतर तत्सम महाराष्ट्र शासनाच्या अन्य भरत्यांना जाताना दिसून येतात पण पारनेरसारख्या दुष्काळी आणि ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना अचुक मार्गदर्शन आणि योग्य शिक्षण मिळाले नाही की ते भरकटले जातात या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवुन पारनेर शहरामध्ये ’वीर योध्दा’ करिअर अ‍ॅकॅडमीची सुरवात करण्यात आल्याचे प्रतिपादन अ‍ॅकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष आशिष पोटे यांनी केले. पारनेरमध्ये ’वीरयोद्धा’ या करियर अकॅडमीचे  उद्घाटन नुकतेच माजी सैनिक श्री. आबाजी झगडे, माजी सैनिक श्री. बाजीराव कोल्हे व संस्थापक अध्यक्ष श्री. आशिष पोटे यांच्या हस्ते झाले. या उद्घाटन प्रसंगी उपस्थितांशी अनौपचारिक संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी श्री. वारे सर, पदवीधर मतदार संघाचे तालुका अध्यक्ष श्री. सतीश पठारे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारनेरसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थी वेगवेगळ्या भरत्यांसाठी प्रयत्न करतात. पण आतापर्यंत विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नव्हते. आता अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना योग्य आणि अचूक मार्गदर्शन मिळेल असे माजी सैनिक श्री बाबाजी झगडे यांनी बोलताना सांगितले. या अकॅडमीमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी अनेक उत्कृष्ट शिक्षक तसेच मैदानावरील सराव घेण्यासाठी श्री. झगडे सर मेहनत घेणार आहे. माजी सैनिक श्री. आबाजी झगडे यांनी या देशाच्या सिमेवर अनेक वर्ष सेवा बजावली असून या अनुभवाच्या जोरावर ते विद्यार्थ्यांना योग्य आणि अचूक मार्गदर्शन करून त्यांना घडवण्याचे काम करणार आहेत. त्याचबरोबर अ‍ॅकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष श्री. आशिष पोटे हे एक अनुभवी शिक्षक तथा मार्गदर्शक म्हणून आपली भूमिका पार पाडणार आहेत. त्यामुळे अकॅडमीतून गुणवंत विद्यार्थी बाहेर पडण्यास मदत मिळणार आहे. या अकॅडमीमुळे पारनेर सारख्या ग्रामीण आणि दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांना पुण्याला किंवा नगरला जाण्याची गरज पडणार नाही असेही माजी सैनिक श्री. झगडे यांनी सांगितले आहे. योग्य मार्गदर्शनाचा अभाव यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होते. पण आता या अकॅडमीमुळे ती उणीव दूर होणार आहे. त्यामुळे पोलीस भरती, आर्मी भरती, नेव्ही भरती किंवा महाराष्ट्र शासनाच्या अथवा भारत सरकारच्या तत्सम पदांसाठी होणार्‍या भरत्यांसाठी या अकॅडमीचा लाभ घेण्याचे आवाहन संचालकांकडून करण्यात आले आहे. पारनेर शहरामधील मार्केट रोड येथे या अकॅडमीची सुरुवात करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी मुलांनी 9139341440 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन श्री. आशिष पोटे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment