सुजलाम अभियान अंतर्गत जिल्ह्यात 40 हजार शोषखड्डयाची निर्मितीचे उद्दिष्ट ः राजेंद्र शिरसागर. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, September 17, 2021

सुजलाम अभियान अंतर्गत जिल्ह्यात 40 हजार शोषखड्डयाची निर्मितीचे उद्दिष्ट ः राजेंद्र शिरसागर.

 सुजलाम अभियान अंतर्गत जिल्ह्यात 40 हजार शोषखड्डयाची निर्मितीचे उद्दिष्ट ः राजेंद्र शिरसागर.

प्रत्येक ग्रामपंचायत 100 दिवसांचा आराखडा तयार करणार.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्हयामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.त्या अनुषंगाने स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत पुढील 100 दिवसांत हागणदारीमुक्त शाश्वतता टिकविणेसाठी जिल्हयात स्थायित्व व सुजलाम अभियान राबविण्यात येणार आहे. या कालावधीत जिल्हयात अभियान कालावधीत किमान 40 हजार शोषखड्डे तयार करण्याचे लक्ष निश्चित करण्यात येत आहे.त्या अनुषंगाने ग्रामपंचायत निहाय उदिष्टे निश्चित करण्यात आले आहे. हागणदारीमुक्तीची शाश्वतता टिकविणे आणि सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक इतक्या शोषखड्डयांचे बांधकाम पूर्ण करणे, यासाठी ग्रामपंचायतींनी ठराव मंजूर करावयाचा आहे.हागणदारीमुक्तीची (ओ.डि.एफ.) शाश्वतता टिकविणे आणि नियोजित शोषखड्डयांच्या बांधकाम करणे यासाठी 100 दिवसांचा आराखडा प्रत्येक ग्रामपंचायत तयार करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली. याबाबत अधिक माहिती देताना मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर म्हणाले ,सुजलाम अभियानाद्वारे लोकसहभागाच्या माध्यमातुन सामुदायिक स्तरावर हागणदरीमुक्त शाश्वततेचे परिणाम अधिक प्रभावीपणे साध्य करणेसाठी आणि ग्रामीण भागात शोषखड्यांच्या निर्मितीतुन सांडपाणी व्यवस्थापन करणे, याबाबींचा समावेश आहे.
नादुरुस्त शौचालयांची दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.नादुरुस्त शौचालय अंतर्गत शौचालय दुरुस्त करण्यासाठी कुटुंबांची निवड करण्यासाठी व्दितीयस्तर हागणदारीमुक्ती ग्रामपंचायत पडताळणी पुर्ण करायची आहे तसेच सर्व नवीन कुटुंबांकडे शौचालय असल्याबाबतची खात्री करावयाची आहे. सदर अभियानाबाबत लोकांना माहिती देण्यासाठी व सहभागासाठी आणि कृतीत उतरविण्यासाठी माध्यमाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे.अभियानाचे जिल्हास्तरावरून संनियंत्रण करणेसाठी अभियान कालावधीमध्ये जिल्हास्तरावरील जिल्हा कक्ष आणि विविध विभागांचे खाते प्रमुख यांच्या क्षेत्रिय भेटी होणार आहेत.स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा-2 मार्गदर्शिकेप्रमाणे हागणदरीमुक्त शाश्वतता आणि शोषखडयांचे बांधकाम यासाठी लागणारा निधी स्वच्छ भारत मिशन 15 वा वित्त आयोग किंवा मनरेगा यांच्या माध्यमातुन उपलब्ध केला जाणार आहे.पुर्ण झालेल्या शोषखडयांची (वैयक्तिकस्तर व सार्वजनिक स्तर) माहिती स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत उपलब्ध असलेल्या एस.बी.एम.-2.0 मोबाईल अ‍ॅप्लीकेशनमधुन नोंदीत करावयाची आहे.दरम्यान याबाबत जिल्ह्यातील उद्दिष्टीत प्रत्येक ग्रामपंचायतींने पाठपुरावा करून, 100 दिवसांचे स्थायित्व व सुजलाम अभियान यशस्वी होईल, यादृष्टीने तात्काळ कार्यवाही करण्याच्या सुचना सर्व गटविकास अधिकारी यांना देणेत आल्या आहेत.
या अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन जल जीवन मिशनच्या प्रकल्प संचालक  श्रीमती. रेश्मा होजगे यांनी केले आहे. स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण ) च्या सन 2021- 22 या वार्षिक कृती आराखड्यामधील जिल्ह्यात 14 तालुक्यातील 775 इतक्या गावा मध्ये एकूण 40 हजार इतके शोषखड्डयाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment