उद्यापासून तीन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, September 20, 2021

उद्यापासून तीन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत.

 उद्यापासून तीन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत.

पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः उद्या मंगळवार दि.21 रोजी  अहमदनगर म.न.पा. मार्फत शहर पाणी योजनेवरिल महत्वाच्या दुरुस्ती कामांसाठी सकाळी 11.00 पासुन सायं. 6.00 पर्यंत शट डाऊन घेण्यात येणार असल्याने मुळानगर पंपींग येथुन शहरासाठीचा पाणी उपसा बंद राहाणार आहे. परिणामी शहर पाणी वितरणाच्या टाक्या भरता येणार नाही. त्यामुळे उद्या तसेच दि 21,22,23 अशा तीन दिवस शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.
उद्या मंगळवार दि.21 रोजी सकाळी 11.00 नंतर पाणी वाटपाच्या बोल्हेगांव, नागापुर, पाईपलाईन रोड, निर्मलनगर, सुर्यनगर, लक्ष्मी नगर,  मुकूंदनगर, केडगांव, नगर - कल्याण रोड परिसर, इ. नागरी भागास पाणी पुरवठा होणार नसुन तो दि.22/09/2021 रोजी करण्यात येणार आहे.
दि.22/09/2021 रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास उदा . सिद्धार्थ नगर, लाल टाकी, दिल्लीगेट, नालेगांव, तोफखाना, चितळेरोड, आनंदी बाजार, खिस्त गल्ली, पंचपीर चावडी,  माणिक चोक, कापडबाजार, नवीपेठ, माळीवाडा (काही भाग),  बालीकाश्रम रोड, सावेडी, स्टेशन रोड, आगरकर मळा, विनायक नगर, इ. भागात पाणी पुरवठा होणार नसुन तो दि. 23/09/2021 रोजी करण्यात येणार आहे.
गुरुवार दि. 23/09/2021 रोजी रोटेशन नुसार  पाणी वाटपाच्या शहराच्या मंगलगेट, रामचंद्र खुंट, कोठला, झेंडीगेट, कचेरी परिसर, दाळमंडई, धरतीचौक, माळीवाडा, बंगाल चौकी, इ. भागासह गुलमोहोर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील/प्रेमदान/ टि.व्ही. सेंटर हाडको, सारसनगर, व बुरुडगांव रोड या भागाचा पाणी पुरवठा गुरुवार ऐवजी शुक्रवार दि.24/09/2021 रोजी करण्यात येणार आहे. तरी वरिल सर्व परिस्थीती विचारात घेवुन नागरिकांनी असलेल्या पाण्याचा वापर कारकसरिने करावा व महानगर पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन आमदार संग्रामभैया जगताप, नगरसेविका श्रीमती शोभाताई सुधाकर बोरकर, नगरसेवक अजिंक्य सुधाकर बोरकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment